You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्रलाईफस्टाइल

पुस्तकात संभाजी महाराजांचा वादग्रस्त उल्लेख; पुस्तकावर संभाजी ब्रिगेडने घेतला आक्षेप

active न्युज, network प्रतिनिधी /पुणे

संभाजी महाराजांविषयी सर्व शिक्षा अभियानातील ‘सर्मथ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात वादग्रस्त उल्लेख केल्याचा आरोप केला असून पुस्तकात ‘संभाजी राजा हा दारूच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा दुखावणारा उल्लेख केल्याचे समोर आले आहे. या पुस्तकावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.
‘सर्मथ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकाचा सर्व शिक्षा अभियानात समावेश असून डॉ. शुभा साठे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. नागपूरमधील लाखे प्रकाशनाने पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. पुस्तकातील पान क्रमांक १८ वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख आहे. संभाजीराजांनी रायगडावरून केलेल्या अनेक खर्‍या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या सर्मथांच्या कानावर येत होत्या. दारूच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात संभाजी राजा सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून सर्मथांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. सर्मथांनी अखेर संभाजीराजांना पत्र लिहिले, असा उल्लेख या पुस्तकात आहे. दरम्यान संभाजी ब्रिगेडने संभाजी महाराज दारूच्या कैफात होते, या वाक्यावर आक्षेप घेतला आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात कुठलाही पुरावा नसताना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

********************************************************************************

*ब्रेकिंग व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या न्यूज पोर्टल ला भेट द्या*

बातम्या व जाहिराती संपर्क करा.

➡ मुख्य संपादक – गोपाल वाढे ९९७०९५६९३४

(active न्युज, network )

आपले ऑनलाइन न्यूज पोर्टल  activenews.in

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close