You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईममहाराष्ट्र

लाच घेताना रेंगेवाहीच्या वनपालाला पकडले

active न्युज, network प्रतिनिधी/ आष्टी
अटक करताना सवलत देण्यासाठी व जप्त केलेली दुचाकी सोडून देण्यासाठी ४0 हजारांची लाच स्वीकारणार्‍या वनपालास ११ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मार्कंडा (कं.) जंगल परिसरात रंगेहाथ पकडले. रमेश पन्नु बलैया रा. रेंगेवाही उपक्षेत्र मार्कंडा ( कं.) असे लाचखोर वनपालाचे नाव आहे.
वनपाल रमेश बलैया याने तक्रारकर्त्यांच्या भावास वन कायद्यांतर्गत लाकुड चोरीच्या गुन्ह्यात अटक करताना सवलत देण्यासाठी व त्याच जप्त केलेली भावाची दुचाकी सोडून देण्याच्या कामाकरिता १ लाख २0 हजार रुपये लाचेची मागणी केली. पहिला हप्ता म्हणून ५0 हजारांची मागणी केली असता, तक्रारकर्त्याने तडजोडीअंती ४0 हजार रुपये देण्याचे मान्य केले. मात्र, तक्रारकर्त्यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने गुरुवारी मार्कंडा (कं) क्षेत्राच्या जंगल परिसरात सापळा रचला. तक्रारकर्त्यांकडून ४0 हजारांची लाच स्वीकारताना वनपाल रमेश बलैया यास अटक करून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार, अपर पोलिस अधीक्षक राजेंद्र नागरे, पोलिस उपअधीक्षक विजय माहूलकर, गडचिरोलीचे पोलिस उपअधीक्षक डी. एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, मोरेश्‍वर लाकडे, विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, महेश कुकुडकर, तुळशिदास नवघरे, घनश्याम वडेट्टीवार, सोनल आत्राम, सोनी तवाडे यांनी केली.

********************************************************************************

*ब्रेकिंग व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या न्यूज पोर्टल ला भेट द्या*

बातम्या व जाहिराती संपर्क करा.

➡ मुख्य संपादक – गोपाल वाढे ९९७०९५६९३४

(active न्युज, network )

आपले ऑनलाइन न्यूज पोर्टल  activenews.in

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close