You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्रशिक्षण व नोकरी

शिरपूर जैन येथील प्रा. अंकुश शिंदे उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित

active न्युज network

प्रतिनिधी:

शिरपूर जैन येथील मोटिवेशनल ट्रेनर प्राध्यापक अंकुश शिंदे नेर (यवतमाळ) येथे झालेल्या राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने क्रांतीज्योती सामाजिक संस्था व विश्वशांती दूत परिवाराच्यावतीने त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र व मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शिरपूर जैन ता. मालेगाव जि. वाशिम जन्मभूमी असलेल्या अंकुश दिगंबर शिंदे सध्या औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले मोटीवेशनल ट्रेनर अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना; त्यांनी व्यवसाय करून आपले शिक्षण पूर्ण केले व त्यामुळे शालेय जीवनात विद्यार्थ्यांची परवड त्यांनी अत्यंत जवळून अनुभवली  असल्यामुळे आपल्या वाट्याला जे आले ते आपल्या अवतीभवतीच्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नये असा त्यांनी निश्चय केला व  त्यांनी आजवर महाराष्ट्रातील शेकडो खेड्यापाड्यातील शाळा व महाविद्यालयात जाऊन ‘विद्यार्थी विकास अभियान’ राबवित आलेले आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.त्यामुळे महाराष्ट्र चित्रपट महासंघ नवी मुंबई यांनी प्रा.अंकुश शिंदे यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित केलेले आहे. नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ येथे ६ अक्टोबर रोजी त्यांना राज्यस्तरीय  उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी बाळासाहेब मंगसुळे, लखन सिंग ठाकूर,चंद्रकला, श्वेता वर्पे, कांचन विर या मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

********************************************************************************

*ब्रेकिंग व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या ‘activeन्यूज पोर्टल’ ला भेट द्या*

आपल्या परिसरातील बातम्या व आपल्या कार्याच्या जाहिराती करीता संपर्क करा.

➡ मुख्य संपादक – गोपाल वाढे ९९७०९५६९३४

(active न्युज, network )

आपले ऑनलाइन न्यूज पोर्टल  activenews.in

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close