You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्यादेशविदेश

फरक्का एक्स्प्रेस घसरली, सात जणांचा मृत्यू

active न्युज network :– उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा रेल्वे दुर्घटना घडली आहे. रायबरेलीवरून दिल्लीला जाणार्‍या न्यू फरक्का एक्सप्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले असून यात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एक जणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. २७ जण गंभीर जखमी आहेत.
हरचंदपूर स्टेशनपासून ५0 मीटर अंतरावर हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेमध्ये अनेकजण किरकोळ जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यामध्ये एका महिलेचा आणि लहान मुलीचा समावेश आहे. रूळाला तडे गेल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते. आपघातानंतर घटनास्थळावर भितीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरड सुरू झाली. स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोहोचले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळावर एनडीआरएफचं पथक पोहोचलं असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरफ पथकासह स्थानिक पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळावर दाखल झाली आहे. अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणी रेल्वेचे उपव्यवस्थापक, पोलिस महासंचालक, आरोग्यविभाग, आणि एनडीआरएफला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

********************************************************************************

*ब्रेकिंग न्युज व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या न्यूज पोर्टल ला भेट द्या*

बातम्या व जाहिराती संपर्क करा.

➡ मुख्य संपादक – गोपाल वाढे ९९७०९५६९३४

(active न्युज, network )

आपले ऑनलाइन न्यूज पोर्टल  activenews.in

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close