You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कारंजाक्राईमदेशविदेशवाशिम

कांरजा येथील अवैध दारू अड्डयांवर वाशिम एल. सी. बी. ची धाड 6 लाख 14 हजार 520 रूपयांचा मुद्देमाल जप्त

active न्युज – : वाशिम येथील एल सी बी पथकाने कारंजा येथील विविध भागात असणा-या अवैध दारू अड्डयांवर 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता धाडी टाकून 6 लाख 34 हजार 520 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  मागील काही दिवंसापासून जिल्हा पेालिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्ह्यातील अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी पोलिस कार्यरत असून, विविध ठिकाणी आतापर्यंत धाडी टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याच अनुषंगाने कारंजा येथील गवळीपुरा भागात अवैध हातभट्टी दारू विक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती वाशिम एल सी बी पथकाला मिळाली. त्यानुसार 10 आक्टोंबर रोजी त्यांनी कारंजा येथील 4 ठिकाणी धाडी टाकून मोहाचा सडवा, हातभट्टीची दारू व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. कासम कालू निनसूरवाले वय 55 वर्ष, छट्टू रमजान नौरंगाबादी वय 65 वर्ष, आसिफ जुम्मा चैधरी वय 25 वर्ष व चांद मदन गारवे वय 40 वर्ष सर्व राहणार गवळीपुरा कारंजा यांच्या अवैध दारू अड्डयावर छापा मारून कासम निनसुरवाले यांचे कडून 4 लाख 32 हजार 520, छट्टू नौरंगाबादी यांच्याकडून 81 हजार 500, असिफ चौधरी यांच्याकडून 60 हजार 500, व चांद गारवे यांच्याकडून 40 हजार रूपयांचा मेाहाचा सडवा हातभट्टी दारू व इतर साहित्य असा एकुण 6 लाख 14 हजार 520 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी मुंबई दारूबंदी कायदा 65 ई व क नुसार पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात वाशिम एल सी बी चे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे, सहायक पोलिस निरीक्षक अतुल मोहनकार, पेालिस उपनिरीक्षक दिनकर गोरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक भगवान गावंडे, पोलिस नायक किशोर चिंचोळकर, प्रेम राठोड, सुनील पवार, अश्विन जाधव, राम नागुलकर, किशोर खंडारे, संतोष शेणकुडे, निलेश इंगळे, अमाले इंगोले, महिला पोलिस तहेमिना शेख, सारीका दांडगे, रेशमा ठाकरे, संगीता शिंदे व मिलींद गायकवाड यांनी केली. ऐन नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी वाशिम एल सी बी ने कारंजात अशा प्रकारची मोठी कारवाई केल्याने अवैध धंदे चालवणार्‍याचे धाबे दणाणले आहे.

********************************************************************************

*ब्रेकिंग न्युज व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या न्यूज पोर्टल ला भेट द्या*

बातम्या व जाहिराती संपर्क करा.

➡ मुख्य संपादक – गोपाल वाढे ९९७०९५६९३४

(active न्युज, network)

आपले ऑनलाइन न्यूज पोर्टल activenews.in

आवाज सामान्य माणसाचा

*आपल्या हक्काचे व्यासपीठ*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close