You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
विज्ञान

….. तर खुशाल डीजे वाजवा : राज ठाकरे

….. तर खुशाल डीजे वाजवा : राज ठाकरे

मुंबई : डीजे बंदीचे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे पुढची सुनावणी होईपर्यंत थोडी प्रतीक्षा करा मात्र गणेशोत्सव मंडळ जर तयार असतील. तर खुशाल डीजे वाजवा, असे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

गणेश विसर्जन मिरवणूकीत डीजे वाजविण्यास न्यायालयाने मनाई केल्यानंतर आपली कैफियत मांडण्यासाठी आज मुंबई, ठाणे, नाशिक मधील डीजे मालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली.डीजे बंदीचे प्रकरण न्यायालयात असल्याने पुढील सुनावणी होईपर्यंत थोडी प्रतीक्षा करा, मात्र गणेशोत्सव मंडळे जर तयार असतील. तर खुशाल डीजे वाजवा, असे त्यांनी डीजे मालकांना सांगितले. डीजे बंदीमुळे आमच्यावर उपसमारीची वेळ आली असल्याने या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढा अशी विनंती डीजे मालकांनी राज ठाकरे यांच्याकडे केली.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close