You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्या

राम कदमांचे नाव घेताच मुख्यमंत्र्यांनी जोडले हात !

राम कदमांचे नाव घेताच मुख्यमंत्र्यांनी जोडले हात !

पुणे : महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणारे आमदार राम कदम यांच्यामुळे भाजपाचे नेते चांगलेच अडचणीत सापडले असतानाच आज कदमांचे नाव उच्चारताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सरळ हात जोडत या विषयाला बगल दिल्याचे समोर आले आहे.

दहिहंडीच्या कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर आज अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाबद्दल केलेल्या चुकीच्या ट्विटमुळे भाजप आमदार राम कदम हे चांगलेच अडचणीत आले आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली पाठराखण आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज माध्यमाबाबत केलेले विधान यामुळे भाजपाच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेतला असताना आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची आ. राम कदम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी काहीही न बोलता केवळ हात जोडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

 

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Check Also

Close
Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close