Uncategorized

कोरोनाच्या संकटात पिंपळदरी येथील गरीब अपंग, विधवा महिलांना जिव्हाळा संस्थेचा मदतीचा हात

ACTIVE NEWS REPORTER
SANDESH KAMBLE
MO.9503151634

मुळावा येथून काही अंतरावर असलेल्या आदर्श गाव पिंपळदरी येथे जिव्हाळा संस्थेच्या वतीने तहसीलदार उमरखेड यांच्या हस्ते गरीब कुटुंबातील अपंग,विधवा महिलांना मोफत धान्य किटचे वाटप करण्यात आले.
गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून राज्यामध्ये कोरोना सारख्या महाभयानक रोगाने थैमान घातले आहे.दिवसंदिवस या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीआणि वाढत असलेली रुग्ण संख्या कमी करण्यासाठी राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आले आहे.त्यामुळे अनेक गरीब कुटुंबावर उपसमारी ची वेळ आली आहे.गेल्या दोन ते अडिच महिन्यापासून हाताला काम नाही जवळ पैसा नाही खायला धान्य नाही अशा हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या अनेक गरीब कुटुंबातील विधवा,अपंग यांना मुळावा येथील जिव्हाळा संस्थेच्या वतीने उमरखेड चे तहसीलदार श्री.खंडारे साहेब यांच्या हस्ते मोफत धान्य वाटप करण्यात आले आहे.
त्यामुळे पिंपळदरी येथील या गरीब विधवा ,अपंग यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या धान्य किटचे वाटप करत असताना कोरोना रोगाबाबत योग्य प्रकारे खबरदारी योग्य काळजी घेण्याचा सल्ला यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.अतुल मादावार यांनी दिला.व तसेच धान्य किटपासून वंचित राहिलेल्या उर्वरित गरीब कुटुंबांना लवकरच मोफत धान्य देण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले या प्रसंगी पिंपळदरी च्या पोलीस पाटील सौ.रंजनाताई रिठे,तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष सुभाष ढाले अंगणवाडी सेविका सौ.कांताताई नाईक आशा सेविका अनिता कबळे युवा सामाजिक कार्यकर्ते अमोल नाईक,गौतम कांबळे ,नारायण रिठे ऍक्टिव्ह न्यूज चे प्रतिनिधी संदेश कांबळे व संस्थेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना रोगामुळे राज्यात खुप बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे या कठीण प्रसंगी जिव्हाळा सारखी संस्था तालुक्यातील अनेक गावातील गरीब कुटुंबांना मदतीचा हात देत आहे. त्यामुळे तालुक्यातील इतर दानशूर व्यक्तिंनी सुद्धा या संकट समयी मदतीसाठी समोर यावे.
श्री.रुपेश खंडारे
तहसीलदार उमरखेड

Share
Tags
bhavnatai gawali

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
%d bloggers like this: