Uncategorized

शहागड खांमगाव चेक पोस्ट वर पोलिस व शिक्षक कर्तव्य बजावताना

Active news/ जालना
तनवीर बागवान
मो.नं.8484876865
20/05/2020

जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंधक कायदा त्याचप्रमाणे फौजदारी प्रक्रिया संहिताअन्वये राज्यात जमावबंदी आदेशही लागू केलेला असून सदर आदेशाचे उल्लंघन होऊ नये व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यादृष्टीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आल्यानंतर त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी जिल्ह्यात  चेकपोस्टवर पोलीस,आरोग्य, महसूल खात्यांच्या पथकाबरोबरच शिक्षकांचेही पथक नियुक्त करण्यात आलेले आहेत.  विविध पथकासह शिक्षकांचे पथक कार्यरत आहे.
जालना व औरंगाबाद येथुन येनारे लोक जिल्ह्यात आल्यानंतर त्यांची नोंदणी करणे, त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी संबंधित यंत्रणेशी समन्वय साधणे, त्यांच्या आरोग्य तपासणीत सहाय्य करणे आदी कामे हे शिक्षकांचे पथक करीत असून सध्या शहागड व खामगाव येथे चेक पोस्ट वर पहावयास मिळत आहे.
औरंगाबाद शहर हे सध्या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.त्यामुळे रेड झोन म्हणून औरंगाबादला ओळखलं जात त्याच रेड झोनमधून येणाऱ्या औरंगाबाद-बीड हायवेवर असणाऱ्या शहागड येथील चेकपोस्टवर ड्युटी करताना श्री आर एम राठोड ,श्री एस एच राठोड ,श्री दराडे ,श्री गव्हाणे ,शिक्षक जी प मा शाळा तलवाडा शिक्षक व पोलीस स्वतः उभे राहून इतर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येणाऱ्या व बीड जिल्ह्यातून पूढे जालना औरंगाबाद ला जाणाऱ्या प्रत्येकाची नोंद व तपासणी करतात ते ही स्वतःच्या जीवाला न भिता. प्रशासनात अनेक कर्मचारी काम करतात त्यात डॉक्टर, नर्स, अधिकारी,पोलीस,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका,मदतनीस हे सर्व आज या कोरोनाच्या या लढाईत लढताय. त्यांच्या या कामप्रति असणाऱ्या निष्ठेला आणि धाडसाला सलाम.

Share
Tags
bhavnatai gawali

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
%d bloggers like this: