महाराष्ट्र

फुफ्फुसाचे नुकसान रोखण्यात ChAdOx1 nCoV-19 लस ठरली परिणामकारक, कोरोनावरच्या चाचणीचा यशस्वी टप्पा..

मुंबई- सध्या कोरोना व्हायरसनं जगभरात विळखा घातला आहे. या व्हायरसनं लाखो लोकांचं जीव घेतला आहे. मात्र अद्याप कोणत्याही देशाला कोरोनावर मात करण्यात यश आलं नाही. कोणत्याही देशानं कोरोनावर लस किंवा ठोस उपाय त्यावरील औषध शोधलं नाही आहे. या कोरोनावर मात करण्यासाठी जवळपास 100 हून अधिक देश याची लस शोधण्यासाठी मेहनत करताहेत. या संसर्गवर औषध शोधण्यासाठी देशादेशात युद्धपातळीवर काम सुरु आहे. दरम्यान कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या जेनर इन्स्टिट्यूटनं लस विकसित केली आहे. या लसीच्या चाचण्या सध्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू आहेत. 

सावध व्हा ! कोरोनानंतर मुलांना होतोय 'कावासाकी' आजार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

आताच समोर आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या लस चाचणीतून समाधानकारक निष्कर्ष समोर आलेत. ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांनी एक महत्वाचा अडथळा पार केला असल्याचं समजतंय. माणसांप्रमाणे प्राण्यांवर करण्यात आलेल्या लस चाचणीचा निष्कर्ष आश्वासक आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

कुठल्याही नव्या आजाराशिवाय फुफ्फुसाचे नुकसान रोखण्यात  ChAdOx1 nCoV-19 लस परिणामकारक ठरली असून सहा माकडांना SARS-CoV-2 व्हायरसचा डोस दिला गेला. याच व्हायरमुळे जगभरात Covid-19 चा फैलाव झाला.  या लसीच्या मानवी चाचणी संशोधनात जवळपास 1 हजार स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. तज्ज्ञांनी ऑक्सफर्डनं केलेल्या कोरोनावरील लस चाचणीच्या निष्कर्षांचे कौतुक केलंय. 

ज्या माकडांना कोरोनावरील ही लस देण्यात आली. त्यांना न्युमोनियाची बाधा झाली नसल्याचं डॉ. पेन्नी वॉर्ड यांनी सांगितलं आहे. पेन्नी हे लंडनच्या किंग कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आहेत. संशोधनामध्ये काही नकारात्मक गोष्टी समोर आल्या तर पुढे मानवी चाचणीमध्ये अडथळा निर्माण होतो. लवकरच या लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मानवी चाचण्या सुरु होणारेत. 

'18 मे'पासून पुढे काय? कसा असेल नव्या ढंगातील लॉकडाऊन 4.0, वाचा महत्त्वाची बातमी…

WHO करणार औषधांचं ट्रायल

जागतिक आरोग्य संघटनानं (WHO) काही औषधांचे ट्रायल (तपासणी) करण्यास सुरुवात केल्याचं समजतंय. या ट्रायलमधून हे औषध उपयोगी आहे का, हे सिद्ध केलं जाणार आहे. 

कोणकोणत्या औषधांचं होणार ट्रायल 

या ट्रायलदरम्यान कोरोनाबाधित रुग्णांना अँटी-व्हायरल औषधं दिली जाणार आहे. यात रेमेडीसवीर, क्लोरोक्विन / हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, लोपीनावीर-रीटोनाविर या औषधांचा समावेश असेल. तर चाचणी दरम्यान, यापैकी कोणत्याही औषधाचा कोरोनाच्या रूग्णावर परिणाम होतो आहे का की नाही याची तपासणी करण्यात येईल. 

काय चाललंय काय ? मुंबईत पुन्हा एकदा पोलिसांवर जीवघेणा हल्ला, तीन पोलिस गंभीर जखमी 

पुण्यात कोरोनाची लस विकसित

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तयार करण्यात आलेल्या लसीची भारतात क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार आहे. ग्लेनमार्कने फाविपीराविर (Favipiravir) नावाची लस तयार केली असून केडिला हेल्थकेयरने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी alfa-2b नावाची लस बनवली आहे. सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही संस्था ऑक्सफर्डच्या लस संशोधन प्रकल्पात भागीदार आहे.  पहिल्या सहा महिन्यात 50 लाख डोस तयार केले जातील. त्यानंतर हे उत्पादन महिन्याला 1 कोटी डोस इतके वाढवण्याची योजना आहे.

satisfactory testing on covid 19 vaccine is done by oxford university read full news

Source link

Share
bhavnatai gawali

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
%d bloggers like this: