Uncategorized

शहागड येथील 26 जण कोरोना पॉझिटिवच्या संपर्कात

शहागड येथील 26 जण कोरोना पॉझिटिवच्या संपर्कात
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल

प्रतिनिधि :- तनवीर बागवान
दिल्ली येथील तबलीकी जमातचे 12 लोक त्यापैकी 8 जण कोरोना पॉझिटीव हे चारचाकी वाहन झायलो व सुमोमध्ये बसुन दिल्ली येथुन त्यांच्या गावी हैदराबाद येथे जात असतांना ते अंबड तालुक्यातील शहागड येथील 26 जणांच्या संपर्कात आल्याने त्यांना काल दि.5 एप्रिल रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहागड येथे दिनांक 30 मार्चला तबलीकी जमातचे 12 जण हे चारचाकी झायलो व सुमोमध्ये बसुन दिल्ली या ठिकाणावरून प्रवास करुन राष्ट्रीय महामार्ग 52 वरील पाचोड जि.औरंगाबाद येथे थाबंवले व मध्यरात्री शहागडला आले असता बीडकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या बीड-जालना चेक पोस्ट वर या दोन्ही गाड्या पोलिसांनी थांबवुन विचारपुस करुन आल्या मार्गाने रात्री 11 वाजता परत पाठवल्या. यावेळी या वाहनाच्या चालकांने हरियाणा डीवायएसपी पास दाखवला परंतु तो या ठिकाणी नाकरण्यात आला व दोन्ही वाहने वापस येऊन पाचोड येथे मुक्काम करुन पाचोड येथे पहाटे नमाज पाठण करुन सकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान शहागड येथे परतले याठिकाणी या वाहनातील लोकांचा संपर्क शहागडच्या एका कुटुंबातील दोन नागरीकांच्या घरी चहा घेतली व त्यानंतर त्यांचा शहागड येथील पंम्चर दुकानदार यांच्याशी संपर्क आला. तेथुन एका हॉटेलच्या मालकाने त्यांचे दोन्ही वाहने गेवराई कडील कच्च्या रस्त्याने चेकपोस्ट चुकवुन रवाना करुन दिली.पुढे हि वाहने निलंगा जि.लातूर येथे चेकपोस्ट वर थांबवुन विचारपुस करुन या 12 लोकांची कोरोना विषयी चाचणी करण्यात आली. यामध्ये 8 जण कोरोना विषाणू लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्या संपर्कात कोण-कोण आलेत हे नागरीक कुठे थाबंले आदी बाबी निलंगा पोलिसांनी सर्व जिल्ह्यातील पोलिसांना माहिती दिली तेव्हा शहागड येथे कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांचा शहागड येथील लोकांशी संपर्क आल्याची माहिती मिळताच यंत्रणा हालवत सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे,उपनिरीक्षक हानुमंत वारे, जमादार बी.आर.आहेर अशांनी शहागड सिल करत कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांच्या संपर्कातील लोकांना जालना येथे तात्काळ हालवले. व शहागड गाव सिल करुन उपयोजनात्मक शहागड गाव संपूर्ण लॉकडाऊन करून सील करण्यात आलेले असून गावात कुणीही आत व बाहेर जाऊ शकत नाही तसेच या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी.शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली 50 पोलिस गावात जागो जागी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे.
यावेळी उपविभागीय

Share
bhavnatai gawali

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
%d bloggers like this: