Uncategorized

जालना जिल्ह्यातील शहागड येथे २६ रुग्ण कोरोना संशयित आढळले

प्रतिनिधि तनवीर बागवान
जिल्हा प्रतिनिधि

जालना जिल्ह्यातील शहागड येथे २६ रुग्ण कोरोना संशयित आढळले आहेत. त्यामुळे मोठी धास्ती शहागड परिसर व अंबड तालुक्यात पसरली आहे. हे २६ संशयित दिल्ली येथील मरकज येथुन आंध्र प्रदेशमध्ये जाणाऱ्या लोकांच्या संपर्कात आले होते. याची माहिती गोंदी पोलिसांना कळताच त्यांनी कार्यतत्परता दाखवत तहसीलदार व आरोग्य विभागाला बोलावून (दि.४) एप्रिल रोजी रात्री ११ वाजता संपर्कात आलेल्या २६ जणांना १०८ रुगवाहिकेद्वारे विलगीकरणसाठी जालना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

गोंदी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, निजामुद्दीनहून आंध्रप्रदेशकडे जाणारे दिल्ली येथील मरकज येथील काहीजण लातूर येथे पकडण्यात आले होते. त्यातील काहीजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. दिल्ली येथील मरकज मधील लोक शहागड येथे थांबले असल्याने हे शहागड येथील लोकांच्या संपर्कात आले होते. यानंतर गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी तहसीलदार राजीव शिंदे व शहागड आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश देशमुख यांना बोलावून या २६ कोरोना संशयितांना १०८ रुगवाहिकाद्वारे जालना रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर शहागड १०० टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. फक्त मेडिकल सुरू ठेवण्यात आले आहेत.

Share
bhavnatai gawali

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
%d bloggers like this: