Uncategorized

सीता राम चरित अति पावन|, मधुर सरस अरु अति मनभावन||

नागपूर : सीता राम चरित अति पावन ।
मधुर सरस अरु अति मनभावन ॥
पुनि पुनि कितनेहू सुने सुनाये ।
हिय की प्यास भुजत न भुजाये॥

एकेकाळी रस्त्यांवर संचारबंदीसदृश चित्र निर्माण करणारे “रामायण' शनिवारपासून पुन्हा दूरदर्शन वाहिनीवर सुरू झाले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदीच्या यशासाठी “रामायण' पुन्हा सुरू करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदीनंतरही नागरिक रस्त्यांवर दिसून येत आहे. त्यावर उतारा म्हणून केंद्र सरकारने ही मालिका पुन्हा सुरू केली आहे. 

जगात हाहाकार माजवणाऱ्या “कोरोना'ने देशही कवेत घेतला आहे. कोरोना विषाणूचा प्रकोप टाळण्यासाठी केंद्र, राज्य सरकार विविध प्रयत्न करीत आहेत. यात आता “रामायण' मालिका पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचाही समावेश झाला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शनिवारी सकाळी 9 वाजता पहिला तर रात्री 9 वाजता दुसरा एपिसोड दाखविला जाईल, अशी माहिती दिली. त्यामुळे 1986 ते 1988 या दोन वर्षांत दर रविवारी रामायण बघणाऱ्या पिढीत उत्सुकता निर्माण झाली आहे.

अधिक वाचा – हेलो… बाळा, मामाची प्रकृती खूप खालावली रे… आईच्या शब्दावर विश्‍वास ठेवला अन्‌…

या दोन वर्षांत अनेक पिढ्यांनी “रामायण'चा आनंद लुटला. यातील एक पिढी कदाचित नसेलही; परंतु त्यावेळी लहान असलेले आता किमान चाळिशीच्या वर पोहोचले असून, त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. एकेकाळी “रामायण'मुळे सकाळी 9 ते 10 या वेळेत रस्त्यांवर संचारबंदीचे चित्र दिसत होते. आता संचारबंदीत नागरिकांनी घराबाहेर येऊ नये म्हणून “रामायण' दाखविण्याची वेळ सरकारवर आली असल्याची टिप्पणीही काही नागरिक करीत आहेत. मात्र, जुनी पिढी आजच्या पिढीला ज्या रामायणाचे दाखले देत आहे, त्या नव्या पिढीला प्रत्यक्ष मालिकेतून राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, रावण, कैकयी, मंथरा ही पात्रे बघायला मिळणार आहते. 

31 वर्षे आठ महिन्यांनी पुनःप्रसारण

15 जानेवारी 1986 ला रामायण मालिकेचा पहिला एपिसोड दाखविण्यात आला तर 31 जुलै 1988 ला शेवटचा एपिसोड दाखविण्यात आला होता. तब्बल 31 वर्षे सात महिने व 28 दिवसांनी रामायण मालिका शनिवारपासून सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा – देशात लॉकडाउन सुरू असताना या पठ्ठ्यान केला हा कारनामा…

महाभारत, शक्तिमानही सुरू करण्याची मागणी

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवर मालिका सुरू करण्याची माहिती दिली. देशभरातील नागरिकांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करीत “महाभारत' व “शक्तिमान' ही मालिका सुरू करण्याची मागणी केली. त्यामुळे या मालिकाही पुन्हा सुरू होण्याची शक्‍यता आहे. 


Source link

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: