Uncategorized

कोरोना चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये साधनसामुग्री उपलब्ध

मुंबई – कोरोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देशांतील आरोग्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी केली. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव आदी उपस्थित होते. 

Coronavirus: कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले 

महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आणि आरोग्य विभागाच्या कामगिरीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

राज्याच्या एकंदरीत परिस्थितीची माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, राज्यात कोरोनाला प्रतिबंधासाठी केंद्राच्या सूचनेनुसार कार्यवाही केली जात आहे. राज्यात आतापर्यंत 18 कोरोनाबाधीतांना घरी देखील सोडण्यात आले आहे. सध्या कोरोना चाचणीसुविधा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विस्तारण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री देखील उपलब्ध आहे मात्र ह्या ठिकाणी चाचणी सुरू करण्यासाठी आयसीएमआरकडून परवानगी मिळणे गरजेचे आहे. ही परवानगी तातडीने द्यावी जेणेकरून धुळे, अकोला, औंगाबाद, सोलापूर, मिरज, नागपूर याठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चाचण्या करता येतील, असे श्री. टोपे यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधासाठी अत्यावश्यक वैद्यकीय संसाधने जशी एन 95 मास्क, ट्रीपल लेअर मास्क, पीपीई, व्हेटीलेटर याची आवश्यक ती उपलब्धता राज्यात आहे. मात्र आपात्कालीन परिस्थिती ओढावल्यास भविष्यकालीन तरतूद म्हणून या अत्यावश्यक वैद्यकीय साधनासामुग्रीची पूर्तता केंद्र शासनाने करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


Source link

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: