Uncategorized

Corona Effect : इंटरनेटची मागणी चौपटीने वाढली; पण कनेक्शन जोडणार कोण?

पिंपरी : कोरोना संसर्गामुळे कर्मचारी 'वर्क फ्रॉम होम' करत आहेत. स्ट्रीमिंग, गेमिंग, व्हिडीओ कॉल, कॉन्फरन्स यामुळे डेटाची मागणी या आठवड्यात चौपटीने वाढली आहे. घरबसल्या माहिती देवाण-घेवाण होत असल्याने इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

– बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तीन लाखांच्यावर आयटी कर्मचारी शहरात आहेत. त्यांना डेटाची गरज मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्या तुलनेत हवे तितके एमबीपीएस स्पीड भेटत नाही. त्यातही सोशल मीडिया वापरकर्ते ही अधिक वेळ ऑनलाईन आहेत. बऱ्याच आयटी कर्मचारी कंपन्यांच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होत आहेत. तसेच युवा वर्ग व नागरिक घरबसल्या प्रत्येक घडामोडींची माहिती ऑनलाईन घेत असल्याने इंटरनेट मागणी अधिकच वाढली आहे. 

– Fight with Corona : रोहित पवारांचा निर्धार, कर्जत-जामखेडकर कोरोनाला हद्दपार करणार!

एकाच परिसरात जवळपास शेकडो वाय-फाय जोडण्या वाढल्या आहेत. ब्रॉडबँडला सर्वाधिक मागणी आहे. तरीही अधूनमधून नेटवर्क डाऊनचे प्रकार घडत आहेत. याचा जास्त परिणाम खासगी नेटवर्क व होम राऊटर्स वापरणाऱ्यांना होत आहे. त्यामुळे इंटरनेटचा वेग मंदावत आहे. महत्वाच्या वेबसाईट ही उघडण्यास वेळ लागत आहे. 

शासकीय कर्मचारी, अधिकारी, दवाखाने देखील आदान-प्रदान करण्यासाठी इंटरनेटचा वापर करत आहेत. त्यातुलनेत इंटरनेट पुरवठा करणाऱ्या एजन्सीकडे मनुष्यबळ उपलब्ध नाही. नव्या जोडणीची मागणी वाढल्याने केबलचाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये हायस्पीड इंटरनेट पुरवठा करणाऱ्याकडे तगादा वाढला आहे. 

– कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय नाही : राजन

संथगती इंटरनेटचा भुर्दंड 

आयटी कर्मचारी वेबऍक्स ऍप्लिकेशन मध्ये काम करत असल्याने ते सिस्को व सॉफ्टकॉन सारख्या ऍप्लिकेशनला सपोर्ट करत नाही. विदेशी कंपन्या सोबत ही दिलेल्या लिंकवर कॉन्फरन्स कॉल जोडला जात नाही. त्यामुळे आठ तासाच्या कामाला दहा तास लागत आहेत. केवळ कमी इंटरनेट स्पीडमुळे विदेशी कंपन्यांना रिपोर्ट वेळेवर जात नसल्याची खंत आयटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

– बातमी महत्त्वाची : स्वत: सिलेंडर आणताय, तर रिबेट नक्की मागा!

इन्स्टॉलेशन शुल्कात काळाबाजार 

इंटरनेट मागणी वाढल्याने इन्स्टॉलेशन शुल्क मनमानी पद्धतीने घेतले जात आहे. इंटरनेट प्लॅनचे दर बदलता येत नसल्याने या शुल्कात काळाबाजार केला जात आहे. एक हजार ते दोन हजार रुपये उकळले जात आहेत.

इंटरनेट केबलसाठी मनुष्यबळ हवे. इतर जिल्ह्यातील मुले या व्यवसायात आहेत.ती गावी गेली आहेत.इंटरनेटची मागणी खूप वाढली आहे. आमचा ही नाईलाज आहे. जोखीम घेऊन काम करणे अशक्य आहे.
– सुभाष ठोंबरे, नेटवर्क, पुरवठादार, थेरगाव

– धक्कादायक ! मुस्लीम नाहीत म्हणून प्राध्यापकानं १५ विद्यार्थ्यांना केलं नापास; जामिया मिलिया विद्यापीठातील घटना! 


Source link

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: