Uncategorized

coronavirus: डोंबिवलीत आणखी एक कोरोना रुग्ण; लग्नात हजेरी, हळदही खेळला

डोंबिवली – राज्यात ठिकठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना डोंबिवली शहरामध्येही आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत डोंबिवलीत कोरोना पॉझिटिव्ह  रुग्णांची संख्या 2 झाली आहे. कोरोना बाधित युवकावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून या युवक काही दिवसांपूर्वी तुर्कस्तान वरून डोंबिवलीत दाखल झाला होता. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 विशेष बाब म्हणजे या 27 वर्षीय युवकाच्या हातावर होम क्वांरटाइन चा शिक्का असूनही तो बिनधास्त पणे सर्वत्र फिरत होता. नुकतीच त्याने एका लग्नात व हळदी समारंभात हजेरी लावली होती. त्यामुळे  या दोन्ही समारंभात सहभागी झालेल्या लोकांची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान हा युवक खूप मोठया प्रमाणावर लोकांशी संपर्कात आल्याने  सर्वेक्षणासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. या वृत्ताला पालिका प्रशासनाने दुजोरा दिला आहे.  आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती या युवकाने आपल्या मित्राला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. या संभाषनाचा स्क्रीन शॉट ही मोठया प्रमाणावर व्हायरल झाला आहे. याअगदर पेरू देशातून आलेल्या एका 35 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते.  मात्र सदर युवक सर्वत्र वावरला व इतरांचाही संपर्कात आल्याने  नागरिकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

आणखी वाचा – मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोहोचलीय का?


Source link

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: