Uncategorized

नागरिकांच्या आरोग्यासाठी महानगरपालिकेने केल्या या उपाययोजना

अकोला : कोरोना विषाणूच्या विरोधाती लढत्या महानगरपालिकेची भूमिका सर्वात महत्त्वपूर्ण आहे. शहरात कोणालाही संसर्ग होऊ नये म्हणून मनपा ॲक्शन मोडवर असून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसोबतच मनपाकडून जनजागृतीवरही भर दिला जात आहे.

केंद्रीय राज्‍यमंत्री संजय धोत्रे, महापौर अर्चना जयंत मसने, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, उपमहापौर राजेंद्र गिरी, स्‍थायी समिती सभापती सतीष ढगे तसेच पदाधिकारी व लोक प्रतिनिधी आणि केंद्र राज्‍य व जिल्‍हा प्रशासनच्‍या आलेल्‍या सूचनानुसार अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे उपाययोजना व जनजागृती केली जात आहे. मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांच्‍या नेतृत्‍वात मनपाचे अधिकारी, कर्मचारी अहोरात्र त्यासाठी झटत आहे.
मनपाने केलेल्या उपाययोजना

 • – तक्रारी घेण्‍याकरिता मनपा कार्यालय येथे स्‍वतंत्र कक्ष.
 • – सनियंत्रण अधिकारी म्‍हणून डॉ.फारूख शेख व नियंत्रण अधिकारी म्‍हणून उपायुक्‍त वैभव आवारे.
 • – नागरिकांना समुपदेशन व तक्रारीकरिता नियंत्रण कक्ष व टोल फ्री क्रं. 18002335733/0724-2434412 कार्यान्वित.
 • – सफाई कर्मचारी यांना संसर्ग होऊ नयेत म्हणून हॅण्‍ड ग्‍लोज व रुमालाचे वितरण.
 • – अकोला शहरामध्‍ये बाहेरील शहरातून, राज्‍यातून व विदेशातून आलेल्‍या नागरिकांचा शोध घेण्यासाठी 40 पथकांचे गठन
 • – शहरातील एकूण 1556 नागरिकांची तपासणी करण्‍यात आली आहे.
 • – अतिक्रमण निर्मुलन पथकांव्‍दारे रस्‍त्‍यालगत उघड्यावर मांस व खाद्य विक्री करणाऱ्या किरकोळ व्‍यावसायिकांना प्रतिबंध.
 • – सर्व शासकीय व खासगी रुग्‍णालये, दवाखाने, सार्वजनिक ठिकाण व प्रभागांमध्‍ये 4 ट्रॅक्‍टरव्‍दारे जंतुनाशक फव्‍वारणी.
 • – प्रभागनिहाय 10 फॉगींग मशीनव्‍दारे व 40 फव्‍वारीणी पंपाव्‍दारे जंतुनाशक फव्‍वारणी व धुवारणी सुरू आहे.
 • – शहरातील सर्व ए.टी.एम.मशीन कक्षांची स्‍वच्‍छता व जंतुनाशक फवारणी करण्‍यात आली आहे.
 • – बस स्‍थानक व रेल्वे स्‍थानक येथील स्‍वच्‍छता व जंतुनाशक फवारणी करण्‍यात आली आहे.
 • – शहरात महापौर व मनपा आयुक्‍त यांच्‍या व्‍दारे कोरोना प्रदुर्भाव टाळण्‍यासाठी जनजागृती करण्‍यात येत आहे.
 • – जनता भाजी बाजार येथील गर्दी टाळण्‍याकरिता भाजी बाजार बाजोरिया प्रांगण व रस्‍त्‍यावर 1 मीटर अंतरावर भाजी व फळे विक्रेता यांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.
 • – शहरातील नागरिकांना ओला व सुका कचरा वेग-वेगळा गोळा करून मनपाच्या 121 कचरा घंटा गाडी व त्याद्वारे जनजागृती.
 • – महापौर व आयुक्‍त यांच्‍या व्‍दारे शहरातील भाजी विक्रेते व मेडीकल स्‍टोर यांना भेटी देऊन दुकानांसमोर गर्दी न करणे व आपसात कमीत कमी 1 मीटर अंतर ठेवणे बाबत सूचना देण्‍यात आल्‍या.
 • – शहरात बाहेगावावरून आलेल्‍या नागरिकांची तपासणी करण्‍यासाठी मनपाचे दोन रुग्‍णालये व 10 नागरी आरोग्‍य केंद्र तसेच निमा संस्‍थांचे सदस्‍यांचे एकूण 22 क्लिनीकांवर मोफत तपाणीसाठी उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहे.
 • – व्‍हॉट्स अॅप, फेसबूक, एस.एम.एस. सोशल मीडिया तसेच मनपा वेब पोर्टलव्‍दारे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठीच्‍या उपाययोजना बाबत जनजागृती.
 • -रस्‍त्‍यावरील बेघर व भिखारी यांना निवारा म्‍हणून आकोट फैल पोलिस स्‍टेशन समोर मनपा शाळा क्रं.६ येथे बेघर निवारा सुरू करून देण्‍यात आला आहे.
 • – परेदेशातून शहरात आलेल्‍या होम क्‍वारंटाईनमध्‍ये असेल्‍या एकूण 96 नागरिकांमधून 14 दिवस पूर्ण झाले असल्‍याने 44 नागरिक होम क्‍वारंटाईनमधून बाहेर आले आहे व सद्या ५२ नागरिक आताही होम क्‍वारंटाईन असून, दररोज मनपाची पथके यांच्‍या संपर्कात.
 • – इंस्‍टीट्युशनल क्‍वारंटाईनसाठी महानगरपालिकेने रेलवे स्‍थानकावरील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह येथे मनपा प्रशासनाव्‍दारे व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे व तेथे 20 बेडची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असून जेवन, मनोरंजन अशा सर्व सुविधा उपलब्‍ध आहे.
 • – शहरातील विविध सामाजिक संघटनांच्‍या संपर्कात महानगरपालिका असून, गरजू लोकांना अन्‍न, धान्‍य तसेच जेवण उपलब्‍ध करून देण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहे व आगामी काळात गरज भासल्‍यास या दिशेने महागनरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्‍ज आहे.
 • – शहरातील जनरल प्रॅक्‍टीश्‍नर, आय.एम.ए.संघटना, डॉक्‍टर्स असोसिएशन महानगरपालिकाच्‍या संपर्कात असून परगावाहून आलेल्‍या नागरिकांच्‍या तपासणीसाठी सेवा घेतली जात आहे.
 • – शहरात फिरत्‍या भाजपाला, दूध, औषध ईत्‍यादी जीवनाश्‍यक वस्‍तुंची कमतरता पडणार नाही म्‍हणून अशी दुकाने उघडी ठेवण्‍यात आली आहे. व महानगरपालिकेचे कर्मचारी, स्‍वयंसेवी संघटना, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्‍या मदतीने या सर्व सेवा सुरळीत सुरू आहेत.
 • – मनपा अधिकारी/कर्मचारी व मनपा कर्मचारी संघटना, समाजसेवी संघटना, सेवा भावी संघटना ही अत्‍यावश्‍यक सेवेमध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आल्‍या असून मनपा आयुक्‍त यांनी सर्वांना अलर्ट राहण्‍याचे सुचना दिली आहे.

Source link

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: