Uncategorized

शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १८६२ अंशांनी वधारून २८ हजार ५३७६ अंशांवर

मुंबई – जागतिक पातळीवर अमेरिकेने कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी उद्योगविश्वाला सावरण्यासाठी २ लाख कोटी डॉलरचे पॅकेज जाहीर केले. तसेच देशांतर्गत पातळीवर केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून लवकरच आर्थिक पॅकेजची घोषणा होण्याच्या शक्यतेने बुधवारी गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार खरेदी केली. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १८६२ अंशांनी वधारून २८ हजार ५३७६ अंशांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीमध्ये ४९७ अंशांची वाढ झाली. तो ८ हजार २९८ अंशांवर बंद झाला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

क्षेत्रीय पातळीवर बँक निफ्टीमध्ये ८.५ टक्क्यांची वाढ झाली. तो १८ हजार ५४९ अंशांवर बंद झाला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ३.५ टक्क्यांनी वधारून १० हजार २१२ अंशांवर बंद झाला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 'कोरोना'पासून देशाला वाचविण्यासाठी पुढच्या २१ दिवसांसाठी 'भारत लॉकडाऊन'ची घोषणा केली. लॉक डाऊनमुळे भारतातील करोनाचा प्रसार आटोक्यात येईल,अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे गुंतवणूकदार पुन्हा खरेदीकडे वळले. 

बुधवारच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर १४.६५ टक्क्यांनी वधारून बंद झाला. अमेरिकी कंपनी फेसबुक जिओमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. परिणामी रिलायन्सचा शेअर १३० रुपयांनी वधारून १ हजार ७४ रुपयांवर स्थिरावला. 

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सेन्सेक्सच्या मंचावर ऍक्सिस बँक, रिलायन्स, मारुती,एचडीफसी , कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचयूएल, टाटा स्टील, इन्फोसिस, टीसीएस यांचे शेअर सर्वाधिक वधारले होते. इंडसइंड बँक, ओएनजीसी, बजाज ऑटो आणि आयटीसीच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. 
जागतिक बाजार: 
जागतिक बाजारात देखील सकारात्मक चित्र होते. अमेरिकेने २ लाख कोटी डॉलरचे 'स्टिम्युलस पॅकेज' जाहीर केल्यानंतर युरोपियन बाजारात देखील त्याचे पडसाद उमटले. यामध्ये ५०० अब्ज डॉलर थेट लोकांच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. तसेच एप्रिल मध्यापर्यंत अमेरिकी अर्थव्यवस्था पुन्हा एकदा वेग धरेल अशी आशा आहे. 

लंडन आणि पॅरिस येथील बाजार ४ ते ५ टक्क्यांनी वधारले. जपानच्या टोकियो शेअर बाजार निर्देशांक निक्केई देखील ७ टक्के तेजीत होता. तर अमेरिकी डाऊ जोन्समध्ये एका दिवसात ११ टक्क्यांची तेजी होती. 


Source link

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: