Uncategorized

तो म्हणाला होता, मी पुन्हा येईल… अन्‌ खरच आला मग…

अमरावती : अडीच महिन्यापूर्वी त्यांची एका लग्नसमारंभात भेट झाली. नजरेला नजर भिडली… दोघेही भेटले, त्याने सांगितले की, मी पुन्हा येईन. तो पुन्हा अमरावतीत आला, अन्‌ अल्पवयीन मुलीचे अपहरण करून रफुचक्कर झाला.
 
गाडगेनगर ठाण्यात 8 जानेवारी 2020 रोजी अपहृत मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून अनोळखी युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. त्याच्या शोधासाठी तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून पोलिस त्याच्या ठिकाणापर्यंत पोचले. त्याला शुक्रवारी (ता. 13) रात्री अटक करण्यात आली. सोबत अल्पवयीन मुलीला (वय 15) ताब्यात घेतले.

रितेश हरिदास छळकर (वय 24 रा. माळेगाव, ता. तेल्हारा) असे अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या युवकाचे नाव आहे. ती मुलगी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे. अडीच ते तीन महिन्यापूर्वी एका लग्नसमारंभामध्ये दोघांनी एकमेकास बघितले. नजरेला नजर भिडली. दोघांनी आपसांत चर्चाही केली. तोपर्यंत तिच्या पालकांना मुलीच्या मनात सुरू असलेली घालमेल कळू शकली नाही. त्याने तिला पुन्हा अमरावतीत येऊन, घेऊन जाईल, असा शब्दही दिला होता. तो शब्द रितेशने 8 जानेवारी 2020 रोजी पाळला.

तेल्हारा परिसरातून पोलिसांनी केली अटक
ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली. निर्धारित वेळ होऊनही ती घरी परतली नाही. त्यामुळे पालकांनी तिचा शोध घेतला. परंतु ती आढळली नाही. त्यामुळे कुणीतरी तिला फूस लावून पळविल्याची तक्रार गाडगेनगर ठाण्यात नोंदविण्यात आली. या कालावधीत अल्पवयीन मुलगी व रितेश हे दोघे अमरावतीत झालेल्या एका लग्नसमारंभात एकमेकांना भेटले होते. याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. रितेशजवळ असलेल्या आधीच्या मोबाईल सिमकार्डचा वापर त्याने मुलीचे अपहरण केल्यापासून बंद केला होता. त्याचे या कालावधीत संपर्कासाठी पाच नवीन सिमकार्ड विकत घेतले होते. मात्र, पोलिसांना तांत्रिक तपास करीत अखेर त्याच्यापर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. रितेशला अटक करून अल्पवयीन मुलीला अमरावतीत आणले. पालकांना घटनेची माहिती दिली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 

– कोरोनाची अशीही कमाल, आले सॅनिटायजर विकायला आणि … 
 

अपहृत मुलीला समुपदेशनासाठी सद्य:स्थितीत सुधारगृहात ठेवले आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्‍यकता भासल्यास पुढील कारवाई केल्या जाईल.
मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.


Source link

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: