Uncategorizedमालेगावविज्ञानशिक्षण व नोकरीसंपादकीय

जि.प.शाळेतून प्राथमिक शिक्षण घेवून ऐश्वर्या झाली एम.बी.बी.एस.

मोठ्या बहिणीच्या शिक्षणा साठी भाऊ झाला आधारवड

शिरपूर दि.२४ फेब्रुवारी

डॉ. ऐश्वर्या – एम.बी.बी.एस

                शिरपूर जैन येथील डॉ. ऐश्वर्या संतोष भालेराव या अत्यंत गरीब भूमिहीन कुटुंबातील मुलीने केवळ आणि केवळ वडिलांचे व कुटुंबियाचे स्वप्न साकार करीत अत्यंत खडतर अशा आर्थिक आणि कौटुंबिक स्थितीतून सावरत आपल्या संयमी बुद्धीमत्तेच्या जोरावर शिक्षण पूर्ण करीत एम.बी.बी.एस. हि डॉक्टर पदवी प्राप्त करून  शिरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याने सर्व स्तरातून आज डॉ. ऐश्वर्याचे कौतुक होत असून सत्कार होत आहेत.

डॉ. ऐश्वर्या – एम.बी.बी.एस

                नुकतेच दिनांक १८ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय पदवीचे निकाल लागले आहेत. यामध्ये शिरपूर जैन येथील डॉ. ऐश्वर्या संतोष भालेराव हिने ६३.२३ गुण प्राप्त करून एम.बी.बी.एस. हि डॉक्टर पदवी प्राप्त केली. activenews सोबत बोलतांना तिने आपल्या यशाचे श्रेय तिचा धाकटा भाऊ नरेश, आई, बहिण यांना दिले आहे. तसेच पदवी शिक्षण घेत असतांना मेसचा (जेवणाचा) खर्च उचलून माणुसकीचा परिचय देणाऱ्या डॉ.विजय कानडे व त्याकरिता शिफारस करणाऱ्या समाधान गिर्हे ,किरणताई गिर्हे यांचे आभार मानले. डॉ. ऐश्वर्या हिचे प्राथमिक शिक्षण जि.प.कन्या शाळा शिरपूर येथे झाले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मुळातच अभ्यासात हुशार असल्याने जवाहर नवोदय विध्यालयात तिचा नंबर लागला ६ ते १० पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मुलीची डॉ. होण्याची इच्छा चहा टपरीचा व्यवसाय करणाऱ्या वडिलांनी पूर्ण करण्याचे ठरवले पुढील शिक्षणासाठी ११ वि १२ वीला तिचे अडमिशन आर.एल.टी.कनिष्ठ महाविद्यालय अकोला येथे करण्यात आले. त्यानंतर १२ वी आणि नीट परीक्षेत चांगले मार्क्स मिळाल्याने डॉ. ऐश्वर्याचा शासकीय कोट्यातून एम.बी.बी.एस करिता नंबर लागला परंतु नियतीला काही वेगळाच खेळ करायचा होता. ऐश्वर्या एम.बी.बी.एस प्रथम वर्षाला असतांना तिचे वडील मरण पावले. ऐश्वर्याचा धाकटा भाऊ नरेश इयत्ता १२ वीत शिक्षण घेत होता. २०१६ या वर्षी वडील मरण पावल्याने व बहिणीचे शिक्षण अर्धवट राहू नये बहिणीला शिक्षणात पैशाची कमी पडू नाही म्हणून त्याने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली व वडिलांचा चहाचा व्यवसाय हाती घेतला. मोठी बहिण एम.बी.बी.एस झाली तर लहान बहिणही १२ वी पास होऊन फोरेन्सिक सायन्सला शिकत आहे. वडिलांच्या पश्चात आपल्या दोन्ही बहिणींना वडिलांचा आधार देवून नरेशने मुलींना शिकवण्याची वडिलांची इच्छा पूर्ण केली.तर सर्व परिस्थिती विपरीत असतांना जबाबदारीची जाणीव ठेवत मुलींनी सुद्धा शिक्षणावर लक्ष केंद्रित करून आपल्या आई व भावाच्या माना अभिमानाने उंच केल्या आहेत.

डॉ. ऐश्वर्या – एम.बी.बी.एस

माझ्यावर अचानक आलेल्या जबाबदारीने मी माझे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही परंतु माझ्या बहिणीने त्या सर्वच बाबींची जाणीव ठेवून यश संपादन केले, आणि आज माझे वडील हे बघण्यास असते तर नक्कीच त्यांना खूप आनंद झाला असता. व त्यांचे शब्द होते “मुलगी शिकली प्रगती झाली” आणि माझ्या बहिणीने ते खरे करून दाखवले याचा मला सार्थ अभिमान आहे. – नरेश भालेराव

जाहिरात **

User Rating: Be the first one !

Share
Tags

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: