Uncategorized

शाळेच्या व्यवस्थापकाकडून विद्यार्थ्यांना कॉपीचे धडे

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अटक

मउ : उत्तरप्रदेशच्या मउ जिल्ह्यातील एका शाळेतील व्यवस्थापकाकडून बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्याचे धडे देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. परीक्षेच्या वर्गात बोलणे ही कॉपी नाही. जर कोणी एक- दोन कानाखाली मारले तरी सहन करायचे. पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहायचे. काहीच जमले नाही तर उत्तरपत्रिकेत १०० रुपयांची नोट ठेवून द्यायची. मग उत्तरपत्रिका तपासणारा डोळे झाकून तुम्हाला उत्तीर्ण करेल, अशा प्रकारचे चुकीचे धडे व्यवस्थापकाकडून दिले जात होते.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अटक

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शाळा निरीक्षक डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या निर्देशानुसार व्यवस्थापक प्रवीण मल्लविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अशा व्यक्तीला तुरुंगात टाकलेच पाहिजे, असे प्रसाद म्हणाले. हा प्रकार मउ जिल्ह्यातील मधुबनमध्ये हरिवंश मेमोरियल इंटर महाविद्यालयातील आहे. या महाविद्यालयातील मल्ल हे विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसून आले. मंगळवारपासून यूपी बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. दुसरीकडे मल्ल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. जानेवारीमध्ये महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात आपण असे बोललो होतो. कोणी तरी व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. परीक्षेदरम्यान आपण विद्यार्थ्यांना कॉपीचा सल्ला दिला नाही, असे मल्ल यांचे म्हणणे आहे.

सौजन्य – दै.पुण्यनगरी

Share
bhavnatai gawali

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
%d bloggers like this: