Uncategorized

कामचुकार दांडीबहाद्दर तलाठ्यावर कारवाई करावी

त्रस्त शेतकऱ्याने केली तहसीलदारयांच्या कडे तक्रार

शिरपूर : अतिवृष्टीमुळे मुळे पिकांचे नुकसान झाले त्याची भरपाई म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत देऊ केली आहे. परंतु शासनाच्या या योजनेचा लाभ लाभार्थी शेतकऱ्यांना कामचुकार व दांडी बहाद्दर तलाठ्यामुळे मिळत नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार मालेगांव यांच्या कडे तक्रार केली आहे. 

सदर तक्रारीवर ५४ शेतकऱ्यांच्या सह्या असून तक्रारीत नमूद आहे कि, शिरपूर भाग २ चे तलाठी हे शेतकऱ्यांची कोणतीही कामे वेळेवर करीत नाहीत. तसेच नियमित मद्यपान करून असतात त्यांच्या या व्यसनांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. कार्यालयात भेट दिली असता तेथे ते उपस्थित नसतात. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता. तो होऊ शकत नाही. मंडळ अधिकारी यांना सुद्धा त्यांच्या बाबतीत काही माहिती नसते. आम्हा शेतकर्यांना शासनाच्या अनेक योजनाचा लाभ मिळत नाही असे निवेदनात नमूद केले असून त्याच्या प्रती जिल्हाधिकारी वाशीम, उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी शिरपूर यांना दिल्या आहेत.  

  १.शिरपूर भाग २ चे तलाठी अंभोरे हे  मागील १ वर्षांपासून कार्यालयात येत नाहीत तसेच त्यांचा फोन नंबर वर फोन केला असता बोलत नाहीत, दारूच्या नशेत कार्यालयात असल्याने शिरपूर भाग २ च्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा लाभ मिळू शकला नाही. तसेच मागील काही दिवसांपासून भाग २ च्या तलाठ्याने त्याचे कार्यालय शिरपूर पासून ३ कि.मी. अतरावर असलेल्या गौळखेडा या गावी हलवले आहे याचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे या तलाठ्यावर कारवाई करून निलंबित करण्यात यावे. – रन्नु रेघिवाले शेतकरी

२.तलाठी अंभोरे यांच्या विषयी शेतकऱ्यांच्या यापूर्वीही अनेक तोंडी तक्रारी आलेल्या आहेत. वारंवार तक्रारी आल्यामुळे मी वरिष्ठांकडे अहवाल सादर केला आहे. – घनश्याम दलाल मंडळ अधिकारी शिरपूर

Share
bhavnatai gawali

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
%d bloggers like this: