Uncategorized

शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

शिरपूर आरोग्य केंद्र मध्ये २५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

शिरपूर (प्रतिनिधी)  

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १८ फेब्रुवारी रोजी शिरपूर येथिल शिवप्रेमी तरुनाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 यावेळी.२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी होत आहे. त्यानिमित्त अनेक ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती समिती व शिवप्रेमी नागरिक यांच्यावतीने व्याख्याने ,समाज प्रबोधनाचे कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते . रक्तदान श्रेष्ठ दान समजले जाते सामाजिक बांधिलकी जोपासत शिरपूर येथील शिवप्रेमी तरुणांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत दिनांक १८ फेब्रुवारी रोजी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यावेळी देविदास जाधव,विशाल परिहार, पंकज देशमुख,वसंत  देशमुख, संदीप देशमुख, शशिकांत देशमुख, प्रफुल्ल जाधव, विशाल परीहार, किशोर देशमुख, अमर देशमुख, सुखदेव देशमुख, संदीप देशमुख, प्रकाश शिंदे, किशोर देशमुख, सुखदेव देशमुख, शंकर वाघ, दिनेश मुथा, प्रफुल्ल जाधव, रितेश मनाटकर, नरेश भालेराव, शरद देशमुख यांनी व इतर काही अशा एकूण २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दरम्यान शासकीय रक्तपेढी वाशिम यांनी रक्त संकलन केले यावेळी शेकडो शिवप्रेमी तरुणांची उपस्थिती होती. रक्तदान करण्याकरिता आलेल्या रक्तदात्यांचा पुष्प्गुच्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता किशोर देशमुख, संदीप देशमुख, शरद देशमुख, टिल्लू देशमुख, विशाल परिहार यांच्यासह शिव प्रेमी ग्रुपच्या युवकांनी परिश्रम घेतले.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: