Uncategorized

पोलिसांनाही ५ दिवसांचा आठवडा करा – पंढरी गायकवाड यांची मागणी

शिरपूर (प्रतिनिधी) –

राज्य शासकीय कर्मचारी यांच्यासाठी पाच दिवसांचा आठवडा शासन स्तरावर मंजूर लागू झालेला आहे, त्याच धर्तीवर पोलिसांचा सुद्धा ५ दिवसाचा आठवडा करावा कारण पोलीस सुद्धा राज्य शासनाचे कर्मचारी आहेत. अशी मागणी महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना संपर्क प्रमुख पंढरी देवबा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी वाशीम यांचे कडे निवेदनातून केली आहे.

प्रत्येक महिन्यात जेवढे शनिवार येतात, तेवढ्या दिवसांचा जादा पगार त्या महिन्यात दिला पाहिजे, जर पोलिसांना ५ दिवसाचा आठवडा केला नाही, तर हा पोलिसांवर अन्याय होईल. कायद्यासमोर सारे समान या न्याय तत्वाच्या आधारे, हाय कोर्टात पोलिसांना जाण्यासाठी भाग पाडू नका, ५ दिवसांचा आठवडा जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी लावून धरली पाहिजे आमची मागणी मान्य करा अन्यथा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन करू.असा इशारा महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना संपर्क प्रमुख पंढरी गायकवाड, महाराष्ट्र पोलिस बॉईज महीला संघटना वाशिम जिल्हा अध्यक्षा अनिता सहस्त्रबुद्धे, व महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना उपजिल्हाध्यक्ष महेश माळेकर यांनी निवेदनातून दिला आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिली आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: