Uncategorized

गजानन महाराज प्रकटदिनान्निमित्त आई भवानी संस्थान येथे महाप्रसादाचे आयोजन

शिरपूरात पालखी मिरवणुकीने वेधले लक्ष

जाहिरात **

दुधाळा फाटा येथील गजानन महाराज तैलचित्राजवळ प्रकटदिनानिमित्त आज दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित ६०० ते ७०० भाविकांना, शिरा, गोडभात, केळी अशा प्रकारे प्रसाद वितरीत करण्यात आला. दुधाळा येथील समस्त नागरिकांच्या वतीने एकजुटीने कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरिता प्रयत्न केले गेले, यावेळी तैल चित्र परिसरात मंडप टाकण्यात आला होता. तर दिवस भर भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.

येथील आई भवानी संस्थानवर श्री संत गजानन महाराज प्रकटदिना निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शिरपूर सह परिसरातील हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. हभप सुधाकरपंत दिक्षित महाराज यांच्या वाणीतून तीन दिवस सतत गजानन भक्ती विजय ग्रंथाचे पारायण व दररोज अन्नदान पार पडले.दिनांक १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुशमाबाई यांच्या कार्यक्रमाने शोभा वाढली. तर दिनांक १५ रोजी प्रदीप देशमुख(सपत्नीक) यांच्या हस्ते श्रींचे पूजन व अभिषेक करण्यात आला.  शनिवारी सकाळी १० वाजता गावातून वाजतगाजत पालखी शोभायात्रा काढण्यात आली. गावाच्या मुख्य रस्त्याने निघालेल्या शोभायात्रेचे महिला भाविकांनी आपापल्या घरासमोर भक्तिभावाने स्वागत केले. शोभायात्रा परत संस्थानवर पोहोचल्यानंतर हभप विश्वनाथ महाराज वसारीकर यांनी काल्याचे किर्तन केले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप कण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी काशिरव देशमुख, गजानन देशमुख , खंडूजी खोल्गाडे, रामदास उल्हामले,प्रकाश कापकर, सुखदेव झोरे(दाजी), रवी पुरी यांच्यासह शेकडो भाविकांनी परिसराम घेतले.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: