Uncategorized

गवळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ग्रामपंचायत कार्यालयाला भेट

शिरपूर,- : येथील स्व.पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्याल शिरपूर जैनच्या कला विभागाच्या अंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डब्ल्यू.के. पोकळे व राज्यशास्त्र विषयाचे प्रा.राम जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन स्थानिक शिरपूर जैन येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले होते , या अभ्यास दौऱ्याचा हेतू विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीची रचना आणि कार्य प्रत्यक्षरीत्या समजून घेता यावे हा होता, त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील सरपंच, सचिव, ग्रामपंचायत कर्मचारी यांना विविध प्रश्न विचारून ग्रामपंचायतीच्या विविध कार्याची व सरपंच आणि सचिवांच्या अधिकारांची व ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. याचबरोबर कार्यालयातील आवक-जावक वही, जन्म-मृत्यू नोंदणी वही, घरपट्टी व पाणीपट्टी वसूली अशा विविध बाबींची माहिती करून घेतली.
अभ्यास दौऱ्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुनीताताई गणेश अंभोरे , सचिव भागवत बोरकाडे, लिपिक संतोष देशमुख, महावीर बेलोकर , सेवक गणेश बोराटे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले या दौऱ्यासाठी प्रा.आर.डी.कुटे प्रा.एस.जी.जहिरराव प्रा.वासुदेव सुरुशे व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या दरम्यान घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी सोमटकर तर आभार कु. शिल्पा लाहे या विद्यार्थिनीने मानले.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: