Uncategorized

भरधाव पिकअपने दुचाकीस उडवल्याने १जागीच ठार, १ गंभीर

बोलेरो पिकअप चालकाने या नंतर १ ऑटोला धडक देवून केले पलटी

शिरपूर दि १६ फेब्रुवारी २०२०

भरधाव पिकअप चालकाने बेजबाबदारपणे आपले वाहन चालवून दुचाकीस उडवल्याने दुचाकीवरील ६५ वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना दिनांक १६ फेब्रुवारी ११ : ४५ वाजताचे दरम्यान घडली.

                सविस्तर असे कि, जिंतूर जि.परभणी येथून साडी विक्री करणाऱ्या काही महिला व युवकांना मध्य प्रदेश मध्ये घेवून जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाचा चालक मजबुरसिंग प्रेमसिंग याने एम.पी.३६ जि.०८०२ क्रमांकाचे वाहन बेजबाबदार पणे भरधाव चालवून रिसोड – शिरपूर रोड वर शिरपूर गावा जवळ टी.व्ही.एस. इटकरी रंगाच्या दुचाकीवर (गाडीवर नंबर प्लेट नव्हती) रिसोड वरून मालेगांव कडे प्रवास करणाऱ्या(मयत) ग्यानूजी लोडूजी घायाळ वय ६५ वर्ष रा.लोणी स.म.ता. लोणार व (जखमी) शिवाजी रुपचंद राठोड रा.गंधारी, ता.लोणार, जि.बुलढाणा यांना पाठीमागून जोरदार धडक दिली यामध्ये ग्यानूजी लोडूजी घायाळ यांच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागल्याने भरपूर रक्तस्त्राव झाल्याने घटनास्थळी मृत्यू झाला, तर जखमी शिवाजी रुपचंद राठोड यांना उपचार साठी रुग्णालयात हलविण्यात आले असून ग्यानूजी लोडूजी घायाळ यांचा मृतदेह शवविच्छेदना करिता मालेगाव येथे पाठविण्यात आला आहे.

सदर पिकअप चालकाने हा अपघात झाल्यानंतर आपले वाहन शिरपूर येथील रिसोड फाटा परिसरातून वळवून नवीन जैन मंदिर मार्गे वळविले तेंव्हा शिरपूर येथील बोबडे यांच्या भाजीपाला वाहून नेणाऱ्या एपे आटोला सुद्धा जोरदार धडक दिली ज्यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून आटोचे फार नुकसान झाले आहे व त्यामधील भाजीपाला रस्त्यावर पडून नुकसान झाले आहे.  या अपघातानंतरही त्याने आपले वाहन उभे न करता नवीन जैन मंदिर परिसराला वळसा घालून वाहन देशमुख वेटाळातून संभाजी चौकात आणले रस्ता अरुंद असल्याने व समोर बैलगाडी असल्याने वाहन चालक मजबुरसिंग प्रेमसिंग याने वाहन तेथेच सोडून पळ काढला त्यामुळे संशय आल्याने तेथे उभ्या असलेल्या संभाजी नवयुवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिरपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटना स्थळ गाठून पो.कॉ. गंगाधर अडाणी यांनी वाहन शिरपूर पोलीस स्टेशन येथे आणले. (सदर वाहन चालकाने रिसोड ते शिरपूर दरम्यान कुठेतरी आणखी एखादा अपघात घडवून आणल्यानेच तो पळून जाण्याच्या उद्देशाने बेदरकार पने वाहन चालवत होता. त्यामुळे हे पुढील अपघात झाले  असण्याची शक्यता आहे.) वृत्त लिहीपर्यंत वाहनातील महिला व युवक यांना पोलीस स्टेशन येथे बसवून ठेवण्यात आले होते तर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

मृतक ग्यानुजी सावकार व त्यांची दुचाकी

मृत देह नेण्यास रुग्णवाहिकांकडून नकार देण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते संतोष नामदेव भालेराव व इतर नागरिकांनी तालुका स्तरावर शववाहिनी उपलब्ध व्हावी व त्यासाठी राजकीय पुढार्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली.

पिकअप ने धडक देवून पळती केलेला आटो
दोन्ही वाहनांना धडक देणारी पिकअप

अपघातांचा योगायोग

लोणार तालुक्यात किन्ही गावाजवळ झालेल्या अपघातात शिरपूर जैन येथून जवळच असलेल्या पांगरखेडा येथील सखुबाई पांडुरंग शिंदे वय ५५ वर्ष यांचा मृत्यू झाला, त्या औरंगाबाद मध्ये दवाखान्यात असलेल्या भावाला भेटण्यासाठी आसेगांव येथून आपल्या नातेवाईकासह बोलेरो वाहनाने जात होत्या त्यावेळी आयशर व मालवाहू वाहनास धडक लागल्याने अपघात झाला. तर लोणी ता.लोणार येथील ग्यानूजी लोडूजी घायाळ वय ६५ वर्ष यांचा पांगरखेड येथून जवळच असलेल्या शिरपूर परिसरात अपघाती मृत्यू झाला आहे. दोन्ही घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घडल्या आहेत.

सखुबाई पांडुरंग शिंदे
क्षतिग्रस्त बोलेरो वाहन
आयशर वाहनाला डीझेल टेंक दिलेली धडक

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: