Uncategorized

बंदोबस्तावेळी पोलिसांना खुर्च्यांची व्यवस्था करावी

शरद पवार यांचे अनिल देशमुख यांना पत्र

पोलिसांच्या व्यथांची घेतली दखल

मुंबई : राजकीय नेत्‍यांच्या सभा किंवा दौऱ्याच्या वेळी बंदोबस्तासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला जातो. सभा-दौरा संपेपर्यंत हे पोलीस उभेच असतात. या पोलिसांना बसण्यासाठी व्यवस्था करावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवून केली आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, नेत्यांचा सभा व कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करावा लागतो. बंदोबस्तावरील पोलिसांना रस्त्यावर तासन्तास उभे राहावे लागते. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या या त्रासाची दखल घेतली आहे. शरद पवार यांनी याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्र पाठवले आहे.

‘राज्यात मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या दौऱ्याप्रसंगी गर्दीचे नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त नेमला जातो. जाहीर सभा आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी पोलीस यंत्रणेवर ताण येत असतो. तसेच इतरवेळी पोलीस कर्मचाऱ्यांना तासन्तास तिष्ठत उभे राहावे लागते. कर्मचाऱ्यांसोबतच पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील तिष्ठत उभे असतात.

बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचारी-अधिकारी तत्पर आणि सज्ज असावयास हवे. मात्र सभा सुरळीत चालू असताना विशेषत: महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्राण सहन करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या बसण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना पवार यांनी अनिल देशमुख यांना केली आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: