Uncategorized

पूलवामा येथे शहिद जवानांना ढवळे विद्यालय येथे श्रद्धांजली अर्पण

पोलीस बॉईज संघटनेचा पुढाकार

प्रतिनिधी

मागील वर्षी पूलवामा हल्यातील शहिद झालेल्या भारतीय ४४ विर जवानांना आज दिनांक १४/०२/२०२० रोजी सकाळी ११:४५ वाजता श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कै.कोंडबा तात्या ढवळे विद्यालय शिरपूर या ठिकाणी विद्यालयातील सर्व शिक्षक, प्राचार्य,व महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना शिरपूर शहर सर्व ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिरपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  समाधान वाठोरे उपस्थित होते यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, विद्यार्थ्यांनि शिकून चांगलं बनाव, गुन्हेगारी च्या मार्गावर जाऊ नये, तसेच मुली/महिलांना जर कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल, तर महिलांनी पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा,तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संपर्क प्रमुख पुणें जिल्हा / वाशिम जिल्हा,पंढरी देवबा गायकवाड यांनी विध्यार्थ्यांना संबोधित केले यावेळी ते म्हणाले कि, देशभक्ती ही ३६५ दिवस आपल्या मनात असली पाहिजे, देशाप्रती आपले प्रेम असणे गरजेचे आहे, युवा पिढी व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, आज सर्वच पोलिस अधिकारी व कर्मचारी देशावर असलेले आर्मी जवान यांच्या मुळे सर्व नागरिक सुरक्षित आहेत. यावेळी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी त्याचबरोबर रवि देशमुख,महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना शिरपूर शहर अध्यक्ष, यांच्यासह शेकडो युवा ग्रामस्थ उपस्थित होते. “ना जाती साठी, ना पाती साठी, एक दिवस देशाच्या रक्षणकर्त्यासाठी” असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी उपस्थित विध्यार्थी
जाहिरात *

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: