Uncategorized

बेपत्ता अल्पवयीन जोडप्याचा अवघ्या २४ तासात शोध

शिरपूर पोलिसांची कामगिरी

शिरपूर जैन येथून जवळच असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलगा वय १४ वर्ष  व मुलगी वय १७ वर्ष दिनांक १० फेब्रुवारीचे रात्री संगनमत करून गावातून निघून गेले होते. दोन्ही कडील प्राप्त तक्रारी नुसार पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखूनशिरपूर पोलीस स्टेशन ठाणेदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात एक पथक गाठीत केले ज्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखेडे, महिला पोलीस जया खराटे, गंगाधर अडाणी, प्रवीण गोपनारायन यांनी अत्यंत शिताफीने तांत्रिक विश्लेषकांच्या सहाय्याने बुलढाणा जिल्ह्यात शेगाव जवळ दोन्ही अल्पवयीन युगलांना ताब्यात घेतले.

सविस्तर वृत्त असे कि, दिनांक ११ फेब्रुवारी अल्पवयीन मुलगी कल्पना (काल्पनिक नांव) वय १७ वर्ष हिच्या वडिलांनी(जे एका शाळेवर शिक्षक आहेत) शिरपूर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली कि, त्यांची मुलगी दिनांक १० ते ११ फेब्रुवारीचे रात्री दरम्यान गावातीलच कल्पेश(काल्पनिक नांव) वय १४ याच्या सोबत कुठेतरी निघून गेली. गावात शोधाशोध केली असता मिळून आली नाही. सकाळच्या दरम्यान मुलीच्या वडिलांना कळले कि, पूर्वी ते ज्यांच्या कडे भाड्याने राहत होते त्यांचा मुलगा कल्पेश (काल्पनिक नांव) हा  हिरो होंडा स्पेंडर प्लस वाहने त्याच रात्री दरम्यान गावातून निघून गेलेला आहे.त्यामुळे कल्पना (काल्पनिक नांव) वय १७ वर्ष हिला गावातील कल्पेश(काल्पनिक नांव) वय १४   यानेच फुस लावुन पळवुन नेले आहे. यानुसार शिरपूर पोलिसांनी भां.द.वि. ३६३, ३६३ (ए) नुसार प्रकरण दाखल केले.

तर दुसरी फिर्याद दिनांक १२ फेब्रुवारी कल्पेश(काल्पनिक नांव) वय १४  या मुलाचे वडिलांनी  सुद्धा नमूद केले कि दिनांक १० ते ११ फेब्रुवारीचे रात्री दरम्यान कल्पेश (काल्पनिक नांव) हा घरी कुणालाही काहीही न सांगता हिरो होंडा स्पेंडर प्लस वाहने गावातून निघून गेलेला आहे. यानुसार शिरपूर पोलिसांनी भां.द.वि. ३६३ नुसार प्रकरण दाखल केले.

शिरपूर पोलिसांच्या पी.एस.आय. चंदन वानखेडे यांच्या नेतृवातील पथकाने २४ तासाच्या आत तांत्रिक विश्लेषकांच्या सहाय्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून ताब्यात घेतले असून शिरपूर पोलीस स्टेशन येथे आणून युगलांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले असून वृत्त लिहीपर्यंत कारवाई सुरु होती.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: