Uncategorized

अल्पवयीन मतीमंद मुलीवर लैगिंग अत्याचार

शारीरिक बदल दिसून आल्याने प्रकरण उघडकीस

शिरपूर दि.१३ फेब्रु (प्रतिनिधी)

शिरपूर जैन येथून जवळच असलेल्या एका गावातील अल्पवयीन वय अंदाजे १६ वर्ष मतिमंद मुलीचे गावातीलच एका नराधमाने सतत लैंगिक शोषण करून तिला काही महिन्याचे दिवस गेल्याची घटना दिनांक १२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. सदर पिडीत मुलीच्या आईने दिनांक १३ फेब्रुवारी रोजी शिरपूर पोलीस स्टेशन गाठून माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी २२ वर्षीय युवकाला तपासा करिता मुलगा व मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया केली असल्याची माहिती मिळाली.  सदर युवक हा आपल्या मुलीचे सतत लैंगिक शोषण करत होता. व ती मतिमंद असल्यामुळे तिला त्या गोष्टीची जाणीव होत नव्हती याच गोष्टीचा फायदा त्या युवकाने घेतला अशी माहिती पीडित मुलीच्या आईकडून मिळाली आहे.  वृत्तलिहीपर्यंत दुसऱ्या दिवशी सुद्धा गुन्हे दाखल झालेले नव्हते.

मुलगी मतीमंद असल्याने व अत्याचार करणारा नातेवाईक मुलगा असल्याने परिसरातून नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: