Uncategorized

फन टार्गेट ऑनलाइन जुगारावर छापा; ११ जुगाऱ्यांना अटक

अकोला : जिल्ह्यातील बाळापूर येथील अंजुमन मार्केट येथे सुरू असलेल्या ऑनलाइन जुगारावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापेमारी करून ११ जुगाऱ्यांना अटक केली. पथकाने जुगाऱ्यांकडून ६९ हजार ६२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बाळापूर येथे अंजुमन मार्केटमध्ये फन टार्गेट ऑनलाइन जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकार यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने छापेमारी करून ११ जुगाऱ्यांना अटक केली. परमेश्वर रमेश वाघमारे, मोहम्मद मुस्ताक मोहम्मद एजाज, जावेद अहेमद शहा अहेमद, अब्दुल जाकीर अब्दुल माजिद, शंकर मधुकर घोंगे, विश्वास गणपत खाडे, स्वप्निल देवेंद्र शिरसाठ, गोपाळ लक्ष्मण वानखडे, अब्दुल नबी अब्दुल रहेमान, शेख हनीफ शेख लाल, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीसह व्यवसाय मालक फिरोज सेठ याच्याविरोधात बाळापूर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पथकाने आरोपीकडून ६९ हजार ६२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: