Uncategorized

पन्नास हजार हीट्स असणाऱ्या वेब पोर्टल ला सुद्धा मिळणार सरकारी जाहिरात

सरकारने वेबपोर्टल चालवणाऱ्या मीडिया साठी एक दिलासादायक पाऊल उचलले असून सरकारी जाहिरा तिच्या अटी मध्ये काही बदल केले आहेत ज्यामुळेआता फक्त पन्नास हजार हिट्स असणाऱ्या वेब पोर्टल वर सुद्धा सरकारी जाहिराती झळकणार असून, पन्नास हजार हिट्स मिळवणारे वेब पोर्टल सुद्धा सरकारी जाहिरातींचे हकदार असणार आहेत.

यापूर्वी सरकारी जाहिराती मिळवण्यासाठी 2.5 लाख हिट्स असण्याची आवश्यकता होती. ऊत्तर प्रदेश वेब मीडिया नीती2016 मध्ये सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून या पेक्षा कमी हिट्स असणाऱ्या वेब पोर्टल बंद होण्याचा धोका आता टळला आहे.  तसेच सरकारी धोरणांच्या प्रसार आणि प्रचाराला सुद्धा यामुळे चालना मिळणार आहे.

सरकारी प्रवक्ता सिध्दार्थनाथ सिंह यांनी वेब मीडिया मध्ये केलेल्या तरतुदींची माहिती देताना सांगितले की, सरकारी योजनांच्या आणि कामांच्या प्रचार आणि प्रसार होण्या करिता सन 2016 मध्ये उत्तरप्रदेश वेब मीडिया नीती लागू करण्यात आली होती ज्यामध्ये 2.5लाख आणि त्यापेक्षा जास्त हिट्स घेणाऱ्या वेब पोर्टल्सला जाहिराती देण्यात येणार होत्या. परंतु आता सुधारित धोरणा नुसार सरकारी जाहिराती करिता आवश्यक असणाऱ्या हिट्स ची संख्या2.5 वरून घतवून 50हजार करण्यात आली आहे.  सरकारी जाहिराती करिता सदर पोर्टलला 2 वर्ष पूर्ण असावे अशी अट घालण्यात आलेली आहे.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, वेबसाईट वर मिळणारे हिट्स ची गणती करण्या करता विश्वसनीय आशा थर्ड पार्टी टूल्स (गुगल एनलिटिक्, कॉमस्कोर) यांच्या कडून केले जाईल. याची गणना आधार युनिक युजर असेल. वेबसाईट च्या पांच प्रकारच्या श्रेणी ठरवण्यात आल्या असून वेबसाईट वर जास्तीत जास्त एक पान मूल्याच्या जाहिरातीची अट सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्याचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून इतरही राज्यात याच धर्तीवर निर्णय घेण्यात येण्याची शक्यता असून डिजिटल मेडीयाला चांगले दिवस येणार आहेत.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: