Uncategorized

दिल्लीत काँग्रेसची नाचक्की

६३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त!

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’च्या झंझावातापुढे देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसचा पुन्हा एकदा सुपडासाफ झाला. काँग्रेसला गेल्या विधानसभेप्रमाणे यंदाही भोपळाच पदरी पडला. एवढेच नाही, तर तब्बल ६३ जागांवर काँग्रेस उमेदवारांना अनामतही वाचवता आली नसल्यानेही या मोठ्या पक्षाची नाचक्की झाली आहे.

दिवंगत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत १५ वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसचा सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. पक्षाला सलग दुसऱ्या निवडणुकीत एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. यावेळी ७० पैकी काँग्रेसने ६६ जागा लढवल्या होत्या. तर चार जागा सहकारी राजद पक्षाला सोडल्या होत्या. मात्र, ‘आप’च्या दणदणीत विजयापुढे काँग्रेसचा कुठेही निभाव लागला नाही. चिंताजनक बाब म्हणजे यावेळी काँग्रेसचा मताचा टक्काही कमालीचा घसरला आहे. गतवेळी १० टक्के मते मिळविणाऱ्या काँग्रेसच्या बहुतांशी उमेदवारांना यंदा पाच टक्क्यांहून कमी मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या ६३ जागांवर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. उल्लेखनीय बाब म्हणजे, काँग्रेसला गतवर्षी लोकसभा निवडणुकीत २२.४६ टक्के मते मिळाली होती. पराभव पदरी पडतानाही अनामत वाचविण्यात यशस्वी झालेल्या काँग्रेस उमेदवारांमध्ये गांधीनगरच्या अरविंदर सिंह लवली, बादली मतदारसंघातील देवेंद्र यादव व कस्तुरबानगरातील अभिषेक दत्त यांचा समावेश आहे. अनामत जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोपडा यांची कन्या शिवानी, विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांची कन्या प्रियंका यासह काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष कीर्ती आझाद यांची पत्नी पूनम यासारख्या प्रतिष्ठितांचाही समावेश आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: