Uncategorized

तुरीच्या गंजीला आग ; आगीत शेतकर्याचे मोठे नुकसान

रिसोड :- तालुक्यातील वाघी खुर्द या ठिकाणी एका शेतकऱ्यांच्या तुरीच्या गजीला अज्ञात व्यक्ति ने आग लावली यात 2 एकरातील तुर जळून खाक झाले असून शेतकऱ्यांच मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील वाघी खुर्द येथील शिवाजी भागवत आरू यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची धक्कादायक घटना दिनांक 12 फेब्रुवारी रोज बुधवारला सकाळच्या सुमारास घडली. तुरीची कापणी करून शेतात गंजी लावलेली होती वातावरणात बदल असल्यामुळे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच तुरीची गंजी लावलेली होती व तो शेगांवला गेला होता हे पाहून अज्ञात व्यक्तीने याचा फायदा घेऊन सकाळच्या सुमारास तुरीच्या गंजीला आग लावून पसार झाला
आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आले आहे.
यादरम्यान अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून, शिरपूर पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: