Uncategorized

गवळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट

शिरपूर :येथील स्व. पुंडलीकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालय शिरपूर जैन च्या अर्थशास्त्र विभागाअंतर्गत दिनांक ११ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू. के. पोकळे व अर्थशास्त्र विषयाचे प्रा. वासुदेव सुरुशे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये स्थानिक शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देण्यात आली भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी विपण म्हणजे काय? विपणन व्यवस्था कशी असते? शेतकऱ्यांना विपणनाच्या कोणत्या समस्या भेडसावतात? मालाची प्रतवारी कशी ठरवली जाते ?मालाला भाव कसा दिला जातो? तसेच आडत हमाली यांचे काय दर ,असतात ते कोणाकडून वसुले केले जातात, अशा विविध प्रश्नांची उत्तरे तेथील शेतकरीबंधू, तसेच व्यापारी व आडतदार वर्ग यांच्याकडून विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. याचबरोबर शेतकऱ्याच्या मालाची पाहणी करून शेतकऱ्यांना कोणत्या पिकाचे हेक्टरी किती उत्पादन झाले कोणते पीक घ्यायला तुम्हाला परवडते तसेच वाहतूक व्यवस्था व वाहतुकीचे दर परवडणारे असतात का,उपलब्ध असणारा भाव उत्पादन खर्च जाता परवडतो का, अशा विविध प्रश्न विचारुन  त्यांच्या विविध  समस्या जाणून घेतल्या.

      अभ्यास दौऱ्यासाठी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसनराव घुगे उपसभापती गणपतराव गालट, सचिव दिलीपराव वाझूळकर शिरपूर विभाग प्रमुख शंकर चोपडे, लिपिक किशोर कांबळे तसेच व्यापारी, मापारी, आडते, शेतकरीबंधु व हमाल वर्ग यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले या एकदिवशीय अभ्यास  दौऱ्यासाठी महाविद्यालयातील प्रा. आर एस जुनघरे प्रा. एस. जी. जहिरराव प्रा. आर. डी. कुटे तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते, या दरम्यान घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश राऊत यांनी केले तर, आभार कु. वैष्णवी सोमटकर या विद्यार्थिनीने मानले.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: