Uncategorized

अज्ञात इसमांनी शेतकऱ्याचे पॉलिहाऊस पेटवून दिले!

गौळखेडा येथील घटना; शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान

शिरपूर पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गौळखेडा येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन तुळशीराम वानखेडे यांच्या शेतातील पॉली हाउस अज्ञात इसमांनी २६ जानेवारीच्या रात्री एक वाजेच्या दरम्यान पेटवून दिले त्यामध्ये पॉलिहाऊसचे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

प्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 सविस्तर वृत्त असे की, शिरपूर पासून जवळ असलेल्या गौळखेडा येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन वानखडे यांनी एक वर्षापूर्वी आपल्या शेतामध्ये १० गुंठे क्षेत्रामध्ये पॉली हाउस बांधले आहे. सदर शेतकऱ्याकडे दोन एकर शेतजमीन आहे. सदर जमिनीमध्ये त्यांचा उदर निर्वाह होत नसल्याने त्यांनी पॉलिहाऊस मध्ये रोपवाटिकेचा व्यवसाय चालू केला आहे. २६ ते २७ जानेवारीच्या रात्रीच्यावेळी कुणीतरी अज्ञात इसमाने सदर प्रकार केला असल्याचे गजानन वानखडे यांनी सांगितले शिरपूर पोलिसांनी पंचनामा करून सदर प्रकरणी कलम ४२७ NCR दाखल केला आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत. प्रकरणाचा शिरपूर पोलिसांनी छडा लावून सदर कृत्य करनाऱ्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची तक्रारकर्त्याने मागणी केली आहे.

अस्मानी आणि सुलतानी संकटांनी आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यावर अज्ञात इसमाच्या या भ्याड कृत्यामुळे पूर्ण कुटूंबच आर्थिक संकटात सापडले आहे. सदर शेतकऱ्यावर महाराष्ट्र बँक शाखा शिरपूरचे ८ लाख रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज आता कसे फेडावे या विवंचनेत हे शेतकरी कुटूंब सापडले आहे. शिरपूर पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवून याप्रकरनाचा छडा लावावा व शेतकरी कुटुंबास त्वरित न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: