Uncategorized

गवळी महाविद्यालय शिरपूर जैनची शैक्षणिक सहल माहुरगडला

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पुस्तकी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास करण्याच्या अनुषंगाने, महाविद्यालयात  विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात.  त्यामधीलच विद्यार्थ्यांना आपल्या सभोवताली असणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी, त्या स्थळांचा अभ्यास करता यावा, याच अनुषंगाने स्थानिक स्व. पुंडलीकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू. के .पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली कला विभागाच्या विद्यार्थ्यांचा एक दिवसीय अभ्यास दौरा (शैक्षणिक सहल) आयोजित करण्यात आला होता.

त्याकरिता धार्मिक,  सांस्कृतिक व ऐतेहासिक वारसा असणाऱ्या महुरगडला विद्यार्थ्यांनी भेट दिली. माहूर हे महाराष्ट्रामधिल नांदेड जिल्ह्याचा एक तालुका असून, माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे,  येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांची प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत. येथे मंदिरासमोरच एक ऐतिहासिक वारसा असणारा प्राचीन किल्ला आहे, या किल्ल्यामध्ये अनेक वन्यजीव आढळून येतात. तसेच गावात एक छोटेखानी पुराणवस्तु संग्रहालय आहे.

त्यात कलाकुसरीच्या अनेक वस्तू व पुरातन शिल्पे ठेवली आहेत. त्यातील अंगठ्याएवढी बालाजीची मूर्ती पाहण्यासारखी आहे. अशा या धार्मिक सांस्कृतिक व ऐतिहासिक व निसर्गरम्य परिसराचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेऊन विविध ऐतिहासिक बाबींचा अभ्यास केला या एक दिवसीय अभ्यास दौऱ्याच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयातील प्रा. वासुदेव सुरशे, प्रा. आर. एस. जूनघरे, प्रा.आर डी.कुटे,  प्राध्यापिका मुरादे यांचे विशेष सहकार्य व उपस्थिती होती.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: