Uncategorized

शिरपुरचा सर्वांगीण विकास करण्यास कटीबद्ध – डॉ.शाम गाभणे

प्रा. आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवून देणार

शिरपूर :

वाशिम जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी  शिरपूर येथील  डॉ. शाम गाभणे यांची बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा शिरपुरच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी  त्यांचा सत्कार करण्यात आला.  तसेच  पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य शकील खा पठाण  व सलीम रैघिवाले यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला शिरपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वाशिम जिल्हा परिषदेच्या २० वर्षांच्या इतिहासात प्रथमच शिरपूर येथील काँग्रेसचे डॉ. श्याम गाभणे यांना जिल्हा प. उपाध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचा अखिल भारतीय पत्रकार परिषद शिरपूरच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला शिरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिरपूर येथे दोन कोटी १७ लाख रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली आहे. परंतु अद्याप आरोग्यवर्धिनी केंद्राचा दर्जा मिळालेला नाही. मागील अनेक वर्षापासून शिरपूर पी. एच. सी ला आरोग्य अधिकारी उपलब्ध नाहीत, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत, औषधांचा नेहमीच तुटवडा  असतो. त्यामुळे या बाबीचा विचार करून शिरपूर पी. एच. सी. ला दोन आरोग्याधिकारी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच शिरपूर पी. एच. सी. ला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार, तसेच बऱ्याच वर्षापासून पशुवैद्यकीय दवाखान्याला सुद्धा पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाही लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी  सर्वोपरी प्रयत्न केल्या जातील, शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुद्धा अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहून नागरिकांची कामे करावीत, कामचुकार कर्मचाऱ्यांची हयगयी  केल्या जाणार नाही, असेही ते पुढे बोलताना म्हणाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शहराच्या विकासाबद्दल अनेक बाबीवर त्यांनी प्रकाश टाकला. दरम्यान यावेळी मा.सरपंच सुशांत जाधव अ. भा. म. पत्रकार प. चे अध्यक्ष असलम खान पठाण, शशिकांत देशमुख, कैलास भालेराव, गजानन देशमुख, सुलतान शेख, विलास गावंडे, गोपाल वाढे व इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: