Uncategorized

शिरपूर जैन येथील ठीक – ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा

मतदार जनजागृती रॅली

शिरपुर दि.२६ (प्रतिनिधी) दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी भारताचा राष्ट्रीय सण ७१ वा प्रजासत्ताक दिन अनेक ठिकाणी फार हर्षोल्हासात व विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

  शिरपूर जैन येथील ग्रा.पं.कार्यालय, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, राष्ट्रीयीकृत बँका, कोंडबा तात्या ढवळे विद्यालय, अरिहंत प्राथमिक मराठी शाळा, सर्व जिल्हा परिषद शाळा, उर्दू शाळा, पीर मोहम्मद उर्दू स्कूल, स्व.पुंडलीकराव गवळी महाविद्यालय, ए.बी.सी. किडस कॉन्वेंट, अहिल्यादेवी इंग्लिश स्कूल, मातोश्री शालिनीताई गवळी इंग्लिश स्कूल, मातोश्री कासाबाई दाभाडे विद्यालय इत्यादी ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. अनेक शाळांमध्ये विविध स्पर्धांमध्ये तसेच दहावी- बारावी बोर्डाच्या परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसांचे,पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तर स्व.पुंडलिकराव गवळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती रॅली काढली यामध्ये जागृतीपर विविध घोषणा देण्यात आल्या.

विध्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्धेशाने २६ जानेवारी निमित्त जि.प.मराठी कन्या शाळा, जि.प.उर्दू कन्या शाळा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपरगीत तसेच विविध नाटिका सादर केल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मुख्याध्यापक यांच्या सह शिक्षक व शिकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

तसेच अरिहंत प्राथमिक मराठी शाळेच्या कु समीक्षा नंदकिशोर मडके वर्ग ९ वा च्या विध्यार्थीनीने ग्रा.प.मध्ये दिलेल्या भाषणाने सर्वांची वाहवा मिळविली.

अरिहंत प्राथमिक मराठी शाळा

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: