Uncategorized

पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे सारथी कडून मार्गदर्शन

सारथी संस्थेचे तारादूत गणेश घोडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी विद्यालयात मार्गदर्शन केले

जाहिरात *

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था यांच्या वतीने श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे स्वामी विवेकानंद व त्यांचे विचार या विषयावर गणेश घोडे यांनी मार्गदर्शन केले सारथी संस्थेकडून विविध विषयांवर शाळा कॉलेज ग्रामपंचायत महिला बचत गट इत्यादींना मार्गदर्शन करण्यात येते  त्यासाठी  नितीन हांडे तसेच तारादूत प्रकल्पाचे एमडी देशमुख वाशिम जिल्ह्याचे प्रोजेक्ट ऑफिसर अंकुश घोडके या सर्वांचे महत्त्वाचे योगदान या   प्रबोधन वर्गासाठी मिळाले सारथी संस्थेकडून या राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे समाजातील सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.        

श्री पांडुरंग  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा येथे दिनांक २३ जानेवारीला स्वामी विवेकानंद व त्यांचे प्रेरणादायी विचार या विषयावर गणेश घोडे यांनी मार्गदर्शन केले विवेकानंदांनी केलेल्या उठा जागे व्हा व ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका या उपदेशाचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकारावा व  आप ले भविष्य हे उज्वल बनवावे विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत तयार करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे उदगार त्यांनी काढले या कार्यक्रमासाठी विशेषकरून आमखेडच्या केंद्रप्रमुख इंदिरा राणे या उपस्थित होत्या तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर. एन. देशमुख व इतरही सहकार्य शिक्षक त्यामध्ये एन. डी. भिंगे, एन. व्ही. डोळे, एस. बी. देशमुख, जी. एन. कांबळे, विजय मोरे गजानन कोरडे, विवेक नवघरे, नितीन धारणकर, तुकाराम अवचार, पी. एस. जोगदंड इत्यादी शिक्षक वर्ग उपस्थित होता.

या कार्यक्रमासाठी एकूण ५४१ विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी मंत्रमुग्ध होऊन सुमारे दीड तास प्रबोधनाचा आस्वाद घेतला तरुणांसाठी अशा प्रकारच्या प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे. व  आपण इतरही सर्वच शाळांमध्ये अशा प्रकारच्या प्रबोधनाचे आयोजन करावे अशी संदेश इंदिरा राणे मॅडम यांनी सारथी संस्थेचे तारा दूत गणेश घोडे यांना केली.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: