Uncategorized

खासदार क्रीडा महोत्सवात शे. अब्दुल ने पटकावले सुवर्णपदक

पावर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात ५४ किलो वजनि गटात केली चमकदार कामगिरी

शिरपूर : (प्रतिनिधी) दि. २३ जानेवारी

शे.अब्दुल शे अबराहर

शिरपूर जैन पासून जवळच असलेल्या तिवळी नावाच्या छोट्याश्या खेड्यातील शे.अब्दुल शे अबराहर नावाच्या एका गवंडी काम करणाऱ्या मजुरांचा मुलगा,दोन्हीही पायांनी अपंग असलेल्या तरुणाने नागपूर येथे झालेल्या भव्य खाजदार क्रीडा मोहत्सवात ५४ किलो वजनी गटातून गोल्ड मेडल  जिंकून चमकदार कामगिरी केली आहे.

तिवळी सारख्या छोट्याशा खेड्यात जन्मलेला ,जन्मताच दोन्हीही पायांनी अपंग असलेला शे अब्दुल या तरुनाणे नागपूर येथे झालेल्या खाजदार क्रीडा मोहत्सवामध्ये ५४ किलो वजनी गटातून इथकॅटेगिरी मधून वेटलीपटींग स्पर्धेमध्ये भाग घेतला होता यामध्ये ८५ किलो वजन उचलून त्याने गोल्ड मेडल जिंकले आहे.नागपूर येथे दि १७ ते २४ जानेवारी दरम्यान खाजदार चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.एकूण ३२ हजार खेळाडूंनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे.

दुर्दम्य इच्छाशक्ती व कठोर मेहनत करून त्याने हे यश संपादन केले आहे .पावरलिपटींग या क्रीडा प्रकारामध्ये प्राविण्य मिळवून त्याने आपल्या अपंगत्वावर सुद्धा मात केली आहे.गोल्ड मेडल जिंकून तरुणांपुढे ऐक आदर्श निर्माण केला आहे.या अपंग खेळाडूने आजवर अनेक जिल्हा स्तरीय, राज्यस्तरीय,व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे.

मार्च २०१९ मध्ये झालेल्या राष्ट्रीय पावरलीपटींग स्पर्धेमध्ये  ब्रॉझ मेडल जिंकले आहे.

तिवळी येथील विठ्ठल महाराज विद्यालय येथे या तरुणाने १२ वि पर्यंत शिक्षण घेतले आहे.खेळाप्रति असलेली त्याची अचाट श्रद्धा व आवड पाहून महाराष्ट्र सरकार मध्ये सध्या मंत्री असलेले व अपंगाचा आवाज बनलेले मा बच्चू कडू यानी त्याची अमरावती येथील हनुमान आखाडा येथे कोचिंग व निवासाची व्यवस्ता करून दिली आहे.प्रशिक्षक विकास पांडे हे त्याच्याकडून सराव करून घेतात.

सदर अपंग तरुण अत्यन्त हलाकीच्या परिस्तिथीमध्ये जीवन जगत आहे.त्याच्याकडे उपजीविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नाही शासनाकडून किंवा सामाजिक सस्थांकडून  या तरुणास मदतीची गरज आहे.गोल्ड मेडल जिंककल्याने परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: