Uncategorized

अ. भा. मराठी पत्रकार परिषद शिरपूर अध्यक्षपदी असलम पठाण

सचिव पदी गोपाल वाढे यांना कायम ठेवण्यात आले.

शिरपूर

पत्रकार असलम खान

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा शिरपूरचे माजी पत्रकार अध्यक्ष कैलास भालेराव यांचा १ वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने,  अध्यक्षपदी पत्रकार असलम खान पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तर सचिव पदी गोपाल वाढे यांना कायम ठेवण्यात आले.  दिनांक ६ जानेवारी रोजी पत्रकार संघटनेच्या स्थानिक कार्यालयामध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिरपूर कार्यकारणीचे निवड करण्यात आली. शिरपूर शाखा अध्यक्षपदी असलम खान पठाण, कार्याध्यक्षपदी शशिकांत देशमुख, सचिव पदी गोपाल वाढे तर उपाध्यक्षपदी गजानन देशमुख व शेख सुलतान ( नाना) यांना सर्वानुमते कायम ठेवण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष कैलास भालेराव यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच वृत्तपत्र विक्रेते जयपाल परिहार, मदन गिर्हे व संतोष वाढे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विलास गावंडे, संदीप गावंडे, रामेश्वर इरतकर, दिलीप शिंदे, अनिल साखरे,गणेश घोडे यांच्या सह सर्व पत्रकार मंडळी उपस्थित होती

वृत्तपत्र विक्रेते मदन गिर्हे यांचा सत्कार करण्यात आला

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: