Uncategorized

शिवगीर बाबांचा ७८ वा पुण्यतिथी सोहळ्याचा समारोप

शिवगिरी महाराज

शिरपूर वासीय हिंदू – मुस्लीमांचे आराध्य दैवत  श्री जानगीर महाराज संस्थांचे दुसरे मठाधिपती श्री शिवगिर महाराजांच्या ७८ वा पुण्यतिथी सोहळा गुरुवार दिनांक ०२ ते  दिनांक १० जानेवारी २०२० दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक १०रोजी काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादाचा लाभ जवळपास ५० हजार भाविकांनी घेतला. जानगीर महाराज संस्थानचे २ रे मठाधिपती परमपूज्य श्री शिवगिरी महाराज यांच्या ७८व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त संस्थांवर  दिनांक १० जानेवारी रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ५५ क्विंटल गव्हाच्या पोळ्या तर ३० क्विंटल वांग्याची भाजी तयार करण्यात आली होती. दिनांक १० जानेवारी रोजी   काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संस्थानचे ४ थे मठाधिपती महेशगीरबाबा व परिसरातील विविध संतांच्या उपस्थितीत शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला. या महाप्रसादाचा लाभ शिरपूर परिसरातील गावे तसेच दूरवरून आलेल्या जवळपास ५० हजार भाविकांनी घेतला  श्री शिवगीर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जानगीर महाराज संस्थांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. महाप्रसाद वाटप करिता महिला भजनी मंडळाच्या कार्यकर्त्या, जय गजानन ग्रुप तसेच गावातील युवकांनी आपले योगदान दिले. भक्तांनी अत्यंत शिस्तीत महाप्रसादाचा लाभ घेतला.

अरुंद रस्ता, भाविकांची गर्दीमुळे काही काळ भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: