Uncategorized

ग्रा.पं. शिरपूर येथे सावित्रीमाई जयंती संपन्न

शिरपूर ग्राम पंचायतच्या वतीने देशातील स्त्रियांना मनुस्मृतीच्या जोखडातून मुक्त करणाऱ्या मुक्तीदाता सावित्रीमाई फुले जयंती कार्यक्रम दिनांक ०३ जानेवारी २०२० रोजी संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थित गणेश अंभोरे यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला.  

मुलींसाठी शाळा काढणारे जोतिराव आणि सावित्रीबाई फुले आपल्याला सांगितले गेले. पण आद्य कवयित्री सावित्रीमाई फुले आपल्याला सांगितल्या गेल्या नाहीत. मारेकऱ्याला धर्मपंडीत बनवणारे, विधवांच्या मुलांसाठी बालहत्या प्रतिबंधकगृह सुरु करणारे, केशवपनाविरूद्ध नाभिकांचा संप घडवून आणणारे, बहूजनांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या घरातून बहिष्कृत केलेले फुले दांम्पत्य आपल्याला सांगितले गेले नाही. आपलाच गौरवशाली इतिहास आपल्याला माहित नाही. म्हणून आपण आज इतिहास घडवू शकत नाही. घराघरातून कलेक्टर, कमीशनर, सचिव यांच्या रुपाने आपल्याला आता फुले, शाहू, आंबेडकर घडवायचे आहेत. त्याकरिता महापुरुषांचे विचार अंगीकारून त्या मार्गाने चालावे लागणार आहे. सर्व बहुजन समाजाने एकत्र येवून संघर्ष केल्या शिवाय बहुजानाचे हित साध्य होणार नाही. यावेळी शिरपूर ग्रामपंचायत सरपंच सौ.सुनिता गणेश अंभोरे , ग्रा.प.सदस्य,ग्रा.प. कर्मचारी तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून गणेश अंभोरे उपस्थित होते.

जाहिरात 👇

जाहिरात

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: