Uncategorized

येडशी (कुंड ) येथे भव्य महाआरोग्य शिबीर

नवनाथ गुठे/चोरद….

चोरद येथुन जवळच असलेल्या येडशी (कुंड ) येथे श्री. अवलिया महाराज यात्रेनिमित्त श्री.अवलिया महाराज युवामित्र मंडळ आणि रुग्णसेवा युवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक.१६ डिसेंबर रोजी भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. प्राचार्य दिलीपजी जोशी सर(वाशीम ), मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे (म. पीर ) यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टर उपस्थित असणार आहेत. त्वचारोग तज्ञ डॉ. दीपक ढोके (वाशीम ) स्त्री रोग तज्ञ डॉ. पूजा नितीन धोटे, डॉ. महिंद्रा आडोळे (शेलूबाजार ) हृदय रोग तज्ञ डॉ. नितीन धोटे, डॉ. स्वीटी ताई गोटे, दंतरोग तज्ञ डॉ. अनुराधा गायकवाड (बारड)अकोला डॉ. कमलेश सपकाळ, जनरल तपासणीसाठी डॉ. नंदकिशोर बियाणी, डॉ. अरविंद भगत, डॉ. संतोष बोबडे, डॉ. पवन आगळे, डॉ. कालापाड इत्यादींची उपस्थिती राहणार आहे. यासाठी रुग्णांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. या महाआरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री अवलिया महाराज संस्थान व युवामित्र मंडळ येडशी यांच्या वतीने रुग्णसेवा युवा ग्रुप चे वतीने केले आहे. यासाठी विशेष सहकार्य रुग्णसेवा युवा ग्रुप आणि परिसरातील तरुणांचे लाभणार आहे.तरिही परिसरातील गरजुंनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: