Uncategorized

शिरपूर जैन येथे महात्मा फुले स्मृतीदिन उत्साहात

निर्व्यसनी झालात,तरच खरे जोतिबांचे वारसदार- संदीपपाल महाराज

शिरपूर दि.२९ नोव्हेंबर (प्रतिनिधी)

निर्व्यसनी झालात तरच तुम्ही महात्मा जोतिराव फुले यांचे वारसदार झालात. असे परखड प्रतिपादन संदीपपाल महाराज यांनी आपल्या किर्तनातून केले.ते म.फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फूले यांच्या १२८ व्या स्मृतीदिनानिमित्त दि २८ रोजी शहरात संदीपपाल महाराज गिते, अंजनगाव सुर्जी यांचे प्रबोधनात्मक कीर्तन उत्साहात पार पडले. महाराष्ट्रातील प्रख्यात जनप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य असलेल्या संदीपपाल महाराज यांनी विनोदातून जनसामान्यांचे बेमालूमपणे प्रबोधन केले.  ‘१२ वर्ष सितेला वनवासात ठेवूनही तिला स्पर्श न करणाऱ्या रावणासारखी आपली नितीमत्ता असावी. आपली तरुण मुलगी छत्रपती शिवराय यांच्याकडे सुखरुप असेल. याची शाश्वती  शायिस्तेखानाला सुद्धा होती. असे शिवरायांसारखे निष्कलंक चारित्र्य आपण निर्माण केले पाहिजे. आईवडीलांची सेवा हेच सर्वोत्तम देवकार्य व धर्मकार्य आहे.’ असे प्रबोधनात्मक विचार त्यांनी आपल्या किर्तनातून मांडले. प्रबोधनाला विनोदाची फोडणी दिल्याने श्रोत्यांनी संदीपपाल महाराजांच्या या मेजवानीचा यथायोग्य आनंद लुटला.

अ.भा.माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा किरणताई गिऱ्हे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ‘जोतिबा फुले यांचे विचार सदा सर्वदा अनुसरनीय आहेत. बुद्ध,तुकोबा,शिव,फुले,शाहू, आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करण्यातच समाजाचे हित आहे.’ अशी भुमिका त्यांनी प्रास्ताविकातून मांडली.शहरात स्वच्छता राहावी म्हणून घंटागाडी फिरवणाऱ्या गणेश राऊत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ भालेराव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.तर ठाणेदार समाधान वाठोरे,माजी पं.स.उपसभापती कल्पनाताई अंभोरे, सरपंचा सुनिताताई अंभोरे, पत्रकार शशीकांत देशमुख, कैलास भालेराव, गजानन देशमुख, गोपाल वाढे, विलास गावंडे आणि ग्रा.पं.सदस्य संजय भालेराव, राम गडदे, संजयसिंह गौर, गजानन वानखेडे, ज्ञानेश्वर गावंडे इत्यादी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शेलगाव खवणे व शेलगाव बगाडे येथील अनेक नागरिक या किर्तनासाठी आवर्जून हजर होते. कल्पनाताई चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन केले. तर सागर चोपडे याने आभार प्रदर्शन केले.

Share
bhavnatai gawali

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
%d bloggers like this: