Uncategorized

महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना पुणे जिल्हा च्या वतीने आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी कर्मचारी जवान व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण

२६/११/२००८ मध्ये मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी कर्मचारी जवान व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना पुणे जिल्हा च्या वतीने सायंकाळी ठीक ५:०० वाजता ठिकाण झाशी ची राणी लक्ष्मीबाई पुतळा बालगंधर्व ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवाजीनगर पुणे पर्यंत राष्ट्रगीत म्हणत सुरुवात करून शांतपणे
मशाल कँडल मार्च काढण्यात आले आहे यावेळी शेकडो च्या संख्येने नागरिकांनी सहभागी झाले होते मा.श्री.राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना मा.राहुल दुबाले यांनी नागरिकांना संदेश दिला की , देशाच्या सीमेवर अहोरात्र जीवाची परिवाराची पर्वा न करता आपल्या देशाचे रक्षणासाठी जवान उभे असतात तर देशाच्या आत मध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी तासनतास आपले रक्षण करतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण त्याना सहकार्य केले पाहिजे, पोलिस , जवान यांचा मान राखून राक्षणकर्त्यासाठी एक दिवस देने आपले कर्तव्य आहे.

मा.राहूल दुबाले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात २६/११ मध्ये शहिद पोलिस बांधवाना श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला या मध्ये शालेय विद्यार्थी, पोलिस लाईन बॉईज सहभागी झाले होते,ना जाती साठी ना पाती साठी एक दिवस पोलिसांसाठी असे महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना पुणे जिल्हा च्या वतीने दिवसभर पुणे येथील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये जाऊ जिथे पोलिस दिसेल तिथे गुलाबाचं फुल देऊन धन्यवाद मानले अश्या पध्दतीने शांतपणे मशाल रॅली काढण्यात आली यावेळी महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष नितेश पुजारी, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख मा.पंढरी देवबा गायकवाड,पुणे जिल्हा सचिव संतोष आरघडे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रताप दातार,राजेश शिंदे,सुरज भगत,विश्वंभर येवले,अजय पवार, निलेश पुजारी, तसेच महाराष्ट्र पोलिस बॉईज महिला संघटना रुपाली जाधव,सायली शिंदे ,सविता पाटील,तृषाली जाधव सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share
bhavnatai gawali

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
%d bloggers like this: