Uncategorized

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर पोलीस अलर्ट

ठाणेदार वाठोरे यांची माहिती ; सोशल मीडियावर विशेष लक्ष

राम जन्मभूमी व बाबरी मज्जिद वादाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत येण्याची शक्यता असण्याच्या पृष्ठभूमीवर शिरपूर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून या कालावधीमध्ये सोशल मीडियावर पोलिसांचे विशेष लक्ष असणार असल्याची माहिती ठाणेदार समाधान वाठोरे यांनी  दिली ठाणेदार वाठोरे म्हणाले की, शिरपूर शहर व पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी आजपर्यंत ज्या प्रकारे सर्व धर्मियांचे सण, उत्सव गुण्यागोविंदाने शांततेत साजरे केलेत, सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. त्याच प्रमाणे येणाऱ्या काळात सुद्धा शांतता अबाधित रहावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काही समाज कंटकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील. कोणतीही गय करण्यात येणार नाही. तसेच सोशल मीडियावर या बाबत धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या, अफवा पसरविणाऱ्या पोस्टवर पोलीस दलाच्या ‘सोशल मीडिया’ सेल द्वारे बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याचे आढळून आल्यास त्वरित शिरपूर पोलिस स्टेशनला किंवा आपल्या संपर्कातील सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तीस संपर्क करण्याचे आवाहन ठाणेदार समाधान वाठोरे यांनी केले आहे.

आयोध्या प्रकरणाचा निर्णय लवकरच येणार असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा समाजातील सर्वांनी आदर राखावा कोणीही कायदा-सुव्यवस्था भंग होईल असे कृत्य करू नये. यामध्ये काही आढळून आल्यास कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही.- ठाणेदार समाधान वाठोरे, पोलीस स्टेशन शिरपूर

पोलिस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन

येणाऱ्या काही दिवसांमध्ये रामजन्मभूमी व बाबरी मज्जिद या संवेदनशील विषयावर माननीय सर्वोच्च न्यायालय यांचेकडून पुढील काही दिवसात निकाल अपेक्षित आहेत. हा निकाल देणारी यंत्रणा म्हणजे देशाची सर्वोच्च न्याय व्यवस्था आहे. त्याच्यावर सर्व भारतीय जनतेचा विश्वास आहे.तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व भारतीय नागरिकाने पाळणे बंधनकारक आहे. सदर चा निकाल काहीही असो या निकालानंतर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया व्हाट्सअप,फेसबुक अथवा इतर सोशल मीडिया,पत्रकबाजी टीकाटिपणी देणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणे म्हणजे हा न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तरी नागरिकांनी खालील सूचनांचे पालन करावे.

➡ जमाव करून थांबू नये.
➡ सोशल मीडियावर सदर निकालाचे अनुषंगाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत.
➡ निकालानंतर गुलाल उधळू नये.
➡ फटाके वाजवू नयेत.
➡ सायलेन्सर काढून गाड्या पळवू नयेत.
➡महाआरती अथवा समूह पठण याचे आयोजन करू नये.
➡ निकाला निमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटू नयेत
➡ घोषणाबाजी जल्लोष करू नये.
➡ मिरवणुका रॅली काढू नये.
➡ भाषण बाजी करू नये.
➡ कोणतेही वाद्य वाजवू नये.धार्मिक भावना दुखावण्याचा बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारू नये.
➡ कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडिओ,फोटो फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये.
➡निकालाच्या अनुषंगाने कोणतेही होर्डिंग,फ्लेक्स,बॅनर लावू नये.
➡अतिउत्साही धार्मिक संघटनांकडून युद्ध जिंकल्यासारखे जल्लोष केलेली कृत्ये प्रसारित करू नये.

तरी वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास, जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक भावना भडकवल्यास त्याचेवर भारतीय दंड सहिता कलम

कलम 295 कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे अगर ते अपवित्र करणे.
➡ कलम 295 (अ) कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे.
➡ कलम 298 धार्मिक भावना दुखावण्याचा च्या बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे.
➡ कलम 153(अ) तोंडी किंवा लेखी शब्दांमार्फत ,खुनांमार्फत,आगर दृश्य देखाव्यांद्वारे व अन्य प्रकारे धर्म,वंश,जन्मस्थान,निवास,भाषा,जात किंवा अन्य कोणत्याही कारणांवरून निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढविणे व एकोपा टिकण्यास बाधक कृती करणे.
➡ कलम 188 लोकसेवकाने रितसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे.
➡ आय. टी. अॅक्ट. कलम 66 (फ) सोशल मीडियाच्या (सायबरच्या) माध्यमातून भारताची एकता सुरक्षितता आणि सारवभौमत्व यांना इजा पोहचविणे किंवा न्यायालयाचा अवमान करणे

याशिवाय इतर प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करून मा. न्यायालयात समक्ष हजर करण्यात येईल. तरी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे आपल्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे व सायबर सेलचे लक्ष्य आहे

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: