Uncategorized

शिरपूर परिसरात अवैध सावकारीला आले उधान!!

आपदग्रस्त शेतकऱ्यांची होतेय पिळवणूक; प्रतिबंधात्मक यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष

Story Highlights

  • ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज देणाऱ्या आणि दामदुप्पट व्याज आकारणाऱ्या सावकारांची माहिती मिळवलेली आहे.ठोस पुरावे जमा करण्याचे काम सुरु आहे.ठोस पुरावे मिळताच नावानीशी त्यांची संबंधीत विभागाकडे तक्रार करणार आहे. संदीप देशमुख (सामाजिक कार्यकर्ते, शिरपूर)

खरीप पिकांना पावसाने पुरते झोडपून काढले.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. घरात दाणा नाही व पुढे दिवाळसण आलेला,अशा कैचीत बळीराजा अडकलेला होता.पावसामुळे बाजारपेठ ठप्प असल्याने लघू व्यावसायिक सुद्धा अडचणीत सापडले होते. शेतकऱ्यांची व लघू व्यावसायिकांची ही अडचण अवैध सावकारांसाठी सुवर्ण संधी ठरली.या संधीचे सोने करण्यासाठी परिसरातील अवैध सावकारांनी आपापल्या एजंट मार्फत जाळे पसरले.या जाळ्यात शेतकरी व लघू व्यावसायिक आपसूकच अडकले.

यावर्षी उडीद,सोयाबीन,कपाशी, ज्वारी-बाजरी अशी खरीप पिके काढणीला आली आणि पावसाची रिप रिप वाढतच गेली. संततधार पावसाने पिकांची धुळधाण करून टाकली.आज शेतात जी थोडीबहुत पिके राहली आहेत. ती काढण्यासाठी शेतात अजूनही ही १५-२० दिवस थ्रेशर जाऊ शकत नाही.शेतमाल विकून शेतीचा खर्च,किराणा, कापड, औषधे,दवाखाना इत्यादी देणी शेतकऱ्याला द्यायची होती.समोर दिवाळसण आलेला होता.घरात कपडेलत्ते,लेकीबाळींची ने-आण, त्यांची साडीचोळी इत्यादींसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज होती.शिवाय सरकारच्या सत्तेच्या संगीत खुर्चीचा खेळ संपण्याची दूर दूर शक्यता त्याला दिसत नव्हती. म्हणून नाईलाजाने बळीराजाला सावकारांना शरण जावे लागले.परवानाधारक सावकारांनी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक रक्कम व्याजाने दिल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.तसेच परवाना नसलेल्या सावकारांचेही आहे. जेवढी गरज निकडीची तेवढा व्याजदर अधिक!! या निकषाने शेतकऱ्यांची सध्या पिळवणूक सुरू आहे. काही बहाद्दर तर संभाव्य व्याज अगोदरच कापून घेऊन उर्वरित मुद्दल शेतकऱ्यांच्या हातावर टेकवत आहेत.शिवाय कर्जाऊ रक्कमेच्या संरक्षणासाठी काही सावकार शेतकऱ्यांकडून त्यांचे शेत,घर,प्लॉट इत्यादीचे खरेदी खतही लिहून घेत आहेत किंवा कोरे धनादेश घेत आहेत;अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता आपली मान सोडवणे दुरापास्त होणार आहे.

एकूणच अवैध सावकारी रोखण्यात यंत्रणेला अपयश आले असेल किंवा यंत्रणेने सोयीस्कर डोळेझाकही केलेली असू शकते. परंतू त्यामुळे अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे, हे ही तेवढेच खरे!!

*************************************
जाहिरात

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: